Maharashtra Weather : राज्यात सध्या पावसाचा अंदाज लक्षणीय कमी झालेला आहे. सध्या राज्यात मोठ्या प्रमाणात कोरड्या हवामानाची शक्यता वर्तविली जात आहे. अशातच जाणून घेऊयात 12 नोव्हेंबर रोजी राज्यातील एकूण हवामानाचा अंदाज पुढीलप्रमाणे..
ADVERTISEMENT
हे ही वाचा : AI चा वापर करून लेकीनंच आई-वडील आणि भावाला संपवलं
कोकण
कोकण विभागात मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यांत हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्र
मध्य महाराष्ट्रात पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक, अहिल्यानगर, जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांत पावसाची शक्यता वर्तवली नाही. या एकूण जिल्ह्यात हवामान कोरडे राहणार असल्याची शक्यता आहे.
मराठवाडा
मराठवाडा विभागात बीड, धाराशिव, लातूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्याच समावेश होतो. या एकूण जिल्ह्यात कोरड्या हवामानाची शक्यता वर्तविली आहे.
हे ही वाचा : ऑनर किलिंग प्रकरण! दोन भावांनी मिळून बहिणीचा गळा दाबला, मृतदेह फासाला लटकला अन्...
विदर्भ
नागपूर, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यांना हवामान विभागाने कोणताही अलर्ट वर्तविलेला नाही.
ADVERTISEMENT












