Maharashtra Weather : राज्यातील हवमानाबाबत महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. हवमान विभागाच्या (IMD) नुसार राज्यात मान्सून दाखल होणार आहे. येत्या 11 जुलै रोजी कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात अनेक भागांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असणार आहे. बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पावसाचा जोर कायम वाढू शकतो, असा हवमान विभागाने अंदाज वर्तवला आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : "बाबा आणि काका कामावर गेल्यावर मम्मी आणि काकी मुलांना बोलावतात अन्...', मी पाहिलं होत पण...
कोकणात मान्सूनची परिस्थिती
कोकणात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. रायगड आणि रत्नागिरीसाठी पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर विशेष करून मुंबई आणि उपनगरांमध्ये सखल भागांमध्ये पाणी साचण्याची शक्यता आहे.
पश्चिम महाराष्ट्रात येलो अलर्ट
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर आणि सांगलीतील मान्सूनच्या परिस्थितीचा हवमान विभागाने अंदाज वर्तवला आहे. यातील पुणे आणि साताऱ्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर पश्चिम महाराष्ट्रात हवमानाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे.
मराठवाड्यातील 'या' भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना परभणी या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. तसेच दमट आणि उष्म वातावरणामुळे पिकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
विदर्भातील मान्सून स्थिती
विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली आणि अमरावती येथे विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. नागपूर आणि चंद्रपूर येथे मुसळधार पावसाची शक्यता आहे.
उत्तर महाराष्ट्रातील वातावरण
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगावात मध्यम तर काही ठिकाणा पावसाचा जोर वाढणार आहे. तर उष्ण आणि दमट वातावरणामुळे शेतकऱ्यांची पिकांची काळजी घ्याली.
हेही वाचा : मासिक पाळी तपासण्यासाठी विद्यार्थीनींना केलं विवस्त्र, पालकांनी जाब विचारत केला संताप व्यक्त, नेमकं काय घडलं?
हवामान विभागाने मुसळधार पावसामुळे मुंबई, ठाणे, रायगड यांसारख्या भागात पावसाचे पाणी साचण्याची शक्यता आहे. समुद्रकिनारी जाणे टाळावे, तसेच भरतीमुळे धोका असण्याची संभावना आहे.
ADVERTISEMENT
