Maharashtra Weather : हवामान विभागाने राज्यातील मान्सूनच्या परिस्थितीचा अंदाज वर्तवला आहे. भारतीय हवमान विभागाच्या (IMD)नुसार राज्यात मान्सून सक्रिय असणार आहे. 10 जुलै रोजी राज्यातील अनेक भागांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी कोसळणार आहे. विशेषत: कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा जोरा कायम असेल असा हवमान विभागाने अंदाज जारी केला.
ADVERTISEMENT
हेही वाचा : विकृतीचं टोक! अल्पवयीन तरुणीवर बलात्कार, मित्रांनाही एक चान्स दे असं सांगितलं, अखेर मुलीनं उचललं टोकाचं पाऊल
प्रादेशिक हवमानात कोकण, विदर्भ, मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील हवमानाबाबत माहिती देण्यात आली. यामध्ये शक्यतो मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, नागपूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगरसह अनेक जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे. काही ठिकाणी ऑरेंज अलर्टची शक्यता आहे.
कोकण
कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात पावसाची शक्यता असल्याचा हवमान विभागाचा अंदाज आहे. तर रायगड आणि रत्नागिरीमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तसेच पूरजन्यस्थिती लक्षात घेता नदी नाल्यांभोवती कोणीही जाऊ नये, असा हवमान विभागाने इशारा दिला होता.
मराठवाडा
मराठवाड्यातील विजांसह मध्यम स्वरुपाच्या पावसाच्या सरी कोसळणार आहेत. तर काही ठिकाणी शेतकऱ्यांना चांगलाच फायदा मिळण्याची शक्यता आहे. हवमानाची स्थिती पाहता पिकांचे नुकसान टाळण्याची काळजी घ्यावी.
हेही वाचा : सावित्री नदीवरील पुलासारखी भयंकर घटना, गुजरातमध्ये पूल कोसळला अन् गाड्या गेल्या वाहून 'एवढ्या' लोकांचा मृत्यू
विदर्भ
विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली आणि चंद्रपूरात विजांच्या कडकडाटासह पाऊस थैमान घालेल. तर काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. तसेच पावसामुळे तापमानात किंचितशीही घट होईल, पण दमटपणा कायमच राहील असा हवमान विभागाचा अंदाज आहे.
उत्तर महाराष्ट्र
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे आणि जळगावात मध्यम पावसाची शक्यता तर काही ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी कोसळणार आहेत.
ADVERTISEMENT
