Maharashtra Weather : हवामान विभागाने राज्यातील मान्सूनच्या हवमानाचा अंदाज वर्तवला आहे. भारतीय हवामानशास्त्राच्या विभाग (IMD) नुसार राज्यातील हवामानाच्या अंदाजाबाबत माहिती दिली आहे. यामध्ये तपमान, पर्जन्यमान. वाऱ्याचा वेग, हवामानाची आर्द्रता आणि इतर हवामान घटकांचा समावेश करण्यात आलेला आहे. परिस्थितीनुसार हवामानाचा अंदाज बदलू शकतो. दरम्यान 16 जुलै रोजीच्या हवामान विभागाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे, त्याबाबत जाणून घेऊयात.
ADVERTISEMENT
हेही वाचा : पत्नीनं आपल्याच पतीचा केला खून, मृतदेह जमिनीत पुरला, नंतर स्वत: झाली सरेंडर
कोकण :
कोकणासह, ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये अधूनमधुन ढगाळ वातावरण असेल. तसेच तुरळक प्रमाणात पावसाच्या सरी बरसणार आहेत. तर काही ठिकाणी मध्यम ते जोराचा पाऊस पडणार आहे. समुद्र खवळलेला असेल तसेच समुद्रांच्या लाटेची उंची 0.6 मीटर असेल.
पुणे आणि मध्य महाराष्ट्र :
पुणे आणि मध्य महाराष्ट्रात जोराचा पाऊस पडणार आहे. पुणे आणि सातारा आणि कोल्हापूरात ढगाळ वातावरण असेल. घाटमाथ्यावर जोराचा पाऊस बरसणार आहे. तसेच पुण्यासह काही जिल्ह्यांना 19 जून रोजी पावसाचा हाय अलर्ट दिला आहे.
हेही वाचा : अल्पवयीन मुलगी प्रियकराला भेटायला गेली, मित्रांनी मिळून तिला...मोठं कांड आलं समोर
विदर्भ आणि मराठवाडा :
विदर्भातील नागपूर आणि अमरावतीत मान्सूनची स्थिती ही मध्यम स्वरुपाची असणार आहे. विशेष करून नागपूरात मान्सून हा सरासरी 1205 मिमी पडतो. मात्र, यंदा पावसाची तीव्रता अधिक असू शकते. मराठवाडा येथे मध्यम पावसाची शक्यता आहे. परंतु काही ठिकाणी हलक्या सरींसह ढगाळ वतावरण राहणार असल्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांसाठी मोलाचा सल्ला :
शेतकऱ्यांसाठी पावसाची तीव्रता लक्षात घेऊन पेरणीची घाई टाळावी. तसेच जूनच्या मध्यात मान्सून हा सक्रिय झाल्याने शेतीच्या कामांसाठी योग्य नियोजन करावे लागणार आहे.
ADVERTISEMENT
