Maharashtra Weather : राज्यात हवामान विभागाने 7 ऑक्टोबर रोजी पावसाचा अंदाज जारी केला आहे. राज्यातील भारतीय विभागातील (IMD) अंदाजानुसार, राज्यातील कोकण, विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील हावामानाच्या एकूण अंदाजाबाबत महत्वाची अपडेट पुढील प्रमाणे नमूद करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : 'मला टीम इंडियातील खेळाडूला मारायचंय...', मुलाखतीदरम्यान पाकिस्तानी खेळाडूचं वादग्रस्त वक्तव्य, नेमकं काय म्हणाला?
कोकण :
कोकण विभागातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने मध्यम पावसाचा अंदाज जारी केला आहे. यापैकी पालघर, ठाणे या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे. तर रायगड, रत्नागिरीत हलक्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
मध्य महाराष्ट्र :
मध्य महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, या जिल्ह्यांचा समावेश होतो. यापैकी धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक, तसेच नाशिक घाटमाथा परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज जारी केला आहे. तसेच या भागात हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे. तसेच इतर काही जिल्यात हलक्या पावसाची शक्यता आहे.
मराठवाडा :
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड या जिल्ह्यात हवामान विभागाने हलक्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. या दोन्ही जिल्ह्याला हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे. तसेच हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव जिल्ह्यात हलक्या पावसाचा अंदाज आहे.
हे ही वाचा : 61 वर्षीय पुरुषाला बाई आणि बाटलीचा नाद, महिलेला खोलीत नेलं, नंतर दोघांमध्ये वाद उफळला असता तिला पेटवून दिलं
विदर्भ :
विदर्भातील अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यांचा समावेश होतो. या एकूण जिल्ह्यांपैकी अकोला, अमरावती, बुलढाणा, नागपूर, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यात हवामान विभागाने कसलाही अंदाज वर्तवला नाही. तसेच भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यात हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे.
ADVERTISEMENT











