61 वर्षीय पुरुषाला बाई आणि बाटलीचा नाद, महिलेला खोलीत नेलं, नंतर दोघांमध्ये वाद उफळला असता तिला पेटवून दिलं

मुंबई तक

Crime News : एका 61 वर्षीय पुरुषाने महिलेला खोलीत नेलं आणि तिच्यावर लैंगिक शोषण केलं. त्याचदरम्यान दोघांमध्ये वाद उफळला असता, नंतर जे काही घडलं ते वाचून तुम्हीही आश्चर्यचकीत व्हाल.

ADVERTISEMENT

crime news
crime news
social share
google news

बातम्या हायलाइट

point

61 वर्षीय पुरुषाने महिलेला खोलीत नेलं

point

तिच्यावर लैंगिक शोषण केलं

point

दोघांमध्ये वाद उफळला अन्...

Crime News : केरळच्या त्रिसूरमध्ये एक मन हेलावून टाकणारं धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. एका घरातून धूर निघताना काही रहिवाशांनी पाहिलं, हे चित्र पाहून लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं. काही जणांनी दरवाजा तोडून आत शिरत भयानक दृश्य पाहिलं. तेव्हा स्थानिकांनी संबंधित घटनेची माहिती पोलिसांना सांगितली. या प्रकरणाचा पोलिसांनी शोध घेतल्यानंतर ती खोली एका 61 वर्षीय पुरुष सनीची असल्याचं समजतय. ही घटना केरळातील त्रिशूरमधील आहे. 

हे ही वाचा : नवी मुंबई : 'तुझी शिकण्याची लायकी आहे का?' विद्यार्थिनीचा मुख्यध्यापिकेनं वर्गात केला अपमान, नैराश्यात येऊन विद्यार्थिनीचं टोकाचं पाऊल

गुन्हा लपवण्यासाठी महिलेला दिलं पेटवून 

संबंधित प्रकरणात उशिरा त्रिशूरमधील सकथान बस स्टँडवरून सनीला अटक करण्यात आली. चौकशीदरम्यान त्याने सांगितलं की, तो मृत महिलेला नीटसं ओळखता आलं नाही. तो या घटनेच्या एक दिवसआधी दारूच्या दुकानात तिला भेटायला आला होता आणि नंतर तिला खोलीत घेऊन गेला होता. पोलिसांच्या अंदाजानुसार, सनीनेच महिलेला लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडले होते. तेव्हा दोघांमध्ये वाद झाला आणि सनीने तिच्यावर हल्ला केला. आपला गुन्हा लपवण्यासाठी पीडितेला घरात पेटवून दिलं. 

प्रकरणाचा पोलिसांकडून शोध सुरुच

या प्रकरणात पोलिसांनी शोध सुरु केला आहे, त्यांना जवळच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात सनी आणि महिलेचे एकत्र फुटेज मिळवले. हा पुरावा पोलिसांसाठी महत्त्वाचा सुगावा ठरला. महिलेची ओळख अद्यापही समोर आलेली नाही, परंतु तिचे वय वर्षे हे 35 असल्याचा अंदाज आहे. दरम्यान, आता मृतदेह हा शवविच्छेदनासाठी त्रिशूर मेडिकल कॉलेजमध्ये पाठवण्यात आला. 

हे ही वाचा : शिक्षक महिलेसोबत वर्गात करत होता रोमान्स, मुलांनी पाहताच तो आक्षेपार्ह स्थितीत होता, व्हिडिओ बनवला नंतर...

महिलेची अद्यापही ओळख समोर आली नाही. पोलिसांनी तिचे फोटो आणि सीसीटीव्ही फुटेज सर्व पोलीस ठाणे आणि आजूबाजूच्या परिसरात शेअर करण्यात आले होते. 

हे वाचलं का?

    follow whatsapp