Maharashtra Weather : भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) आणि खासगी हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार, 1 ऑगस्ट 2025 रोजी महाराष्ट्रातील हवामानात मिश्र बदल अपेक्षित आहेत. राज्यातील काही भागांत पावसाचा जोर कायम राहणार असल्याची शक्यता आहे, तर काही ठिकाणी उष्णतेचा तडाखा जाणवेल अशी हवामान विभागाने शक्यता वर्तवली आहे. यंदाच्या मान्सूनच्या सरासरीपेक्षा जास्त पावसाच्या अंदाजामुळे नागरिकांमध्ये सावधगिरीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामध्ये राज्यातील कोकण, विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील हवामान विभागाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : शरीरसंबंध ठेवताना तरुण घेतात गोळ्यांचे डोस, भोगावे लागतात विपरीत परिणाम, अहवाल आला समोर
कोकण :
कोकण किनारपट्टी विशेषकरून रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये 1 ऑगस्ट रोजी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर मुंबई आणि ठाण्यात सकाळी हलका पाऊस आणि दुपारनंतर ढगाळ वातावरण अपेक्षित आहे. कोकण किनारपट्टीला समुद्र असल्याने समुद्रांच्या लाटांचा इशारा देण्यात आला आहे. तसेच मच्छिमारांनी सावध राहण्यास सांगितलं आहे.
पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ :
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये सायंकाळच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुण्यात 28° सेल्सिअस ते 23° सेल्सिअस दरम्यान तापमान राहील.
विदर्भातील नागपूर, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांमध्ये तापमानात वाढ होऊन 35° सेल्सिअस पर्यंत उष्णता जाणवेल. तथापि, संध्याकाळी काही ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. तर विदर्भातील चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, नागपूर, अमरावती, वर्धा, भंडारा या भागात हवामान विभागाने मान्सूनचा येलो अलर्ट जारी केला आहे.
मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र :
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण राहील, परंतु पाऊस मर्यादित असेल. तापमान 32° से. ते 25° सेल्सिअस दरम्यान असेल. तसेच उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे आणि जळगाव जिल्ह्यांमध्ये उष्ण आणि दमट वातावरणाची शक्यता आहे. तापमान हे 34° सेल्सिअसपर्यंत असेल. तर काही ठिकाणी दुपारनंतर हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.
हे ही वाचा : मोठी बातमी! मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपींची निर्दोष मुक्तता, न्यायालयाचा मोठा निर्णय
तसेच उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे आणि जळगाव जिल्ह्यांमध्ये उष्ण आणि दमट वातावरण राहण्याची शक्यता आहे. तापमान 34° सेल्सिअसपर्यंत जाईल. काही ठिकाणी दुपारनंतर हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT
