Maharashtra Weather : पुढील 24 महत्त्वाचे, IMD चा महत्त्वाचा अलर्ट

मुंबई तक

• 05:00 AM • 27 Feb 2026

Maharashtra Weather : भारतीय हवामान विभागाने (IMD) इतर हवामान स्त्रोतांच्या अंदाजानुसार, उद्या 27 फेब्रुवारी रोजी राज्यात मुख्यत्वे हवामान स्वच्छ राहणार आहे. राज्यात तापमान सामान्यपेक्षा काही अंशाने अधिक राहण्याची शक्यता आहे, जाणून घ्या 27 फेब्रुवारी रोजी राज्यातील एकूण हवामान विभागाचा अंदाज.

Maharashtra Weather

Maharashtra Weather

Google CTA

बातम्या हायलाइट

point

भारतीय हवामान विभागाचा अंदाज

point

राज्यात काही ठिकाणी मुख्यत्वे आकाश स्वच्छ

point

जाणून घ्या हवामानाचा अंदाज

Maharashtra Weather : राज्यात काही ठिकाणी मुख्यत्वे आकाश स्वच्छ, काही भागांत ढगाळ वातावरण अपेक्षित आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) इतर हवामान स्त्रोतांच्या अंदाजानुसार, उद्या 27 फेब्रुवारी रोजी राज्यात मुख्यत्वे हवामान स्वच्छ राहणार आहे. राज्यात तापमान सामान्यपेक्षा काही अंशाने अधिक राहण्याची शक्यता आहे, जाणून घ्या 27 फेब्रुवारी रोजी राज्यातील एकूण हवामान विभागाचा अंदाज.

हे वाचलं का?

हे ही वाचा : शिक्षकाने गोठ्यात नेऊन तिसरीच्या विद्यार्थिनीवर केले अत्याचार, गुन्हा दाखल झाल्यानंतर इतर प्रकरणंही बाहेर

मुंबई आणि कोकण :  

मुंबईसह कोकणात वातावरण कोरडं राहील, दुपारी हलके ढग येण्याची शक्यता आहे. दुपारी आकाश स्वच्छ राहील, तसेच पावसाची शक्यता नाही. उष्णतेत वाढ जाणवेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. 

पुणे आणि पश्चिम महाराष्ट्र : 

पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रात स्वच्छ ते आंशिक ढगाळ वातावरण राहील. या एकूण विभागात हवामान कोरडं राहणार आहे. ढगाळ वातावरण असलं तरी अवकाळी पावसाची शक्यता नसेल. 

नागपूर आणि विदर्भ : 

नागपूर आणि विदर्भात मुख्यत्वे स्वच्छ आकाश राहील, असा अंदाज आहे. वाऱ्याचा वेग कमी होईल. थंडावा कमी झाला असून या विभागात कमाल तापमान हे 32 ते 35, तसेच किमान तापमान 30 ते 40 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. 

हे ही वाचा : 7 वीत शिकणाऱ्या मुलीला मोबाईलचं व्यसन, मोबाईल देण्यास बहिणीचा नकार, अखेर स्वत:ला संपवलं

मराठवाडा विभाग : 

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, नांदेड, परभणी आणि धाराशिवमध्ये उष्ण आणि कोरडे वातावरण राहील.