'अल निनो'नंतर आता या Typhoon Dolphin चं टेन्शन, पाऊस थांबणार की धो-धो कोसळणार?

मुंबई तक

• 06:33 AM • 13 Aug 2026

महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता का निर्माण झाली? कमी दाबाचं क्षेत्र, नैऋत्य मोसमी वारे आणि Typhoon Dolphinचा मान्सूनवर होणारा अप्रत्यक्ष परिणाम जाणून घ्या.

maharashtra weather rain alert 13 august and next 3 days typhoon dolphin mumbai

प्रातिनिधिक फोटो

Google CTA

मुंबई: महाराष्ट्रात जुलैच्या अखेरीस झालेल्या अति मुसळधार पावसानंतर ऑगस्टच्या सुरुवातीला पावसाचा जोर काहीसा कमी झाला. मात्र, आता पुढील काही दिवसांत राज्यातील काही भागांत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. यामागे बंगालच्या उपसागरातील बदलती हवामानस्थिती, मध्य प्रदेश-राजस्थान परिसरातील कमी दाबाचे क्षेत्र आणि अरबी समुद्रातून सक्रिय असलेले नैऋत्य मोसमी वारे ही प्रमुख कारणं आहेत.

हे वाचलं का?

नेमकं काय बदललं?

बंगालच्या उपसागरात नवीन कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे ओडिशासह पूर्व भारतातील काही भागांत जोरदार पावसाची शक्यता आहे. त्याचवेळी मध्य प्रदेश आणि राजस्थान परिसरातील कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव महाराष्ट्रावरही जाणवत आहे.

हे ही वाचा>> कल्याणमध्ये कुत्र्यांचा कहर! 24 तासांत तब्बल 161 जणांना चावा, KDMC चा संतापजनक कारभार

अरबी समुद्रातून येणारे नैऋत्य मोसमी वारे (Southwest Monsoon Winds) सक्रिय असल्याने मध्य महाराष्ट्रातील पावसाला चालना मिळत आहे. विशेषतः घाट परिसरात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

13 ते 15 ऑगस्टदरम्यान कुठे पाऊस?

13 ऑगस्ट: गोंदिया, गडचिरोली, नाशिक घाट, ठाणे, पुणे घाट, रायगड, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाट आणि सातारा घाट परिसरात यलो अलर्ट. काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता.

14 ऑगस्ट: चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा येथे यलो अलर्ट. तर पुणे आणि सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट असून अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर घाटात यलो अलर्ट आहे.

हे ही वाचा>> घाटकोपरमध्ये दरड कोसळून 6 जणांचा मृत्यू, दोन चिमुकल्यांनीही गमावला जीव

15 ऑगस्ट: नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया येथे यलो अलर्ट. पुणे, सातारा, रत्नागिरी आणि कोल्हापूर घाट परिसरातही यलो अलर्ट कायम राहण्याची शक्यता आहे.

Typhoon Dolphinचा भारतावर थेट परिणाम?

चीनमध्ये धडकलेला Typhoon Dolphin भारतापासून सुमारे 4,000 किमी दूर आहे. त्यामुळे त्याचा महाराष्ट्रावर थेट परिणाम होत नाही. मात्र, पॅसिफिक महासागरातील मोठ्या हवामान प्रणालींमुळे वाऱ्यांच्या पॅटर्नमध्ये बदल होऊ शकतो आणि त्याचा अप्रत्यक्ष परिणाम भारतीय मान्सूनवर होऊ शकतो. 

महत्त्वाचं म्हणजे Dolphin मुळे भारताचा पाऊस थेट “ओढला” गेला, असं म्हणणं योग्य नाही. पॅसिफिकमधील ही प्रणाली, El Niño-सदृश वातावरण आणि बंगालच्या उपसागरातील हालचाली यांचा एकत्रित परिणाम पाहावा लागतो.