Maharashtra Weather : भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, 30 ऑक्टोबर रोजी राज्यातील काही ठिकाणी हवामान विभागाने पावसाची परिस्थिती कायम राहण्याची शक्यता वर्तवली आहे. तर जाणून घेऊया 30 ऑक्टोबर रोजी राज्यातील हवामान विभागाच्या एकूण अंदाजाबाबत महत्त्वाची अपडेट पुढीलप्रमाणे नमूद करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : बारामतीत युपीएससीचा अभ्यास करणाऱ्या तरुणीला उद्योगपतीकडून लग्नाचं आमिष, वेगवेगळ्या हॉटेलमध्ये नेत लैंगिक शोषण
कोकण विभाग :
कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर आणि ठाणे जिल्ह्याचा समावेश होतो. या विभागातील पालघर जिल्ह्यात हवामान विभागाने पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. तसेच याच भागांतील ठाणे,रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्गात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्र :
मध्य महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. तसेच या भागात हवामान विभागाने पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, या जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. तसेच सातारा जिल्ह्यात हवामान विभागाने हलक्या पावसाचा अंदाज जारी केला आहे.
मराठवाडा विभाग :
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, या तीन जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. याच जिल्ह्यांना हवामान विभागाने पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. तसेच बीडमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. त्यानंतर हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशीव या जिल्ह्यात हलक्या पावसाचा अंदाज आहे.
हे ही वाचा : लेकाची वडिलांकडे दारूसाठी पैशांची मागणी, पैसे देण्यास नकार, लोखंडी रॉडने जन्मदात्याचा केला खून... नागपूर हादरलं
विदर्भ विभाग :
राज्यातील विदर्भात अकोला, अमरावती, बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वर्धा या जिल्ह्यात हवामान विभागाने पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. तसेच वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने पावसाचा कसलाही अंदाज जारी केलेला नाही.
ADVERTISEMENT











