'मतदार यादीत एकाचा पत्ता सुलभ शौचालयाचा', राज ठाकरेंचं वक्तव्य; आता निवडणूक आयोगाकडून स्पष्टीकरण

Election Commission on Raj Thackeray statement : 'मतदार यादीत एकाचा पत्ता सुलभ शौचालयाचा', राज ठाकरेंचं वक्तव्य; आता निवडणूक आयोगाकडून स्पष्टीकरण

election commission of india

election commission of india

मुंबई तक

01 Nov 2025 (अपडेटेड: 01 Nov 2025, 10:12 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

'मतदार यादीत एकाचा पत्ता सुलभ शौचालयाचा', राज ठाकरेंचं वक्तव्य

point

आता निवडणूक आयोगाकडून स्पष्टीकरण

Election Commission on Raj Thackeray statement : "नवी मुंबई आयुक्तांच्या बंगल्यावर शंभरहून अधिक लोकांची नोंदणी आहे. एकाचा पत्ता सुलभ शौचालय आहे, काय बसल्या बसल्या सही घेतली काय?", असा सवाल उपस्थित करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मतदार याद्यांतील बोगसपणावर भाष्य केलं होतं. यासंबंधित बातम्या आता निवडणूक आयोगापर्यंत पोहोचल्या आहेत. निवडणूक आयोगाने म्हणजेच जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, ठाणे यांनी याबाबत परिपत्रक काढून स्पष्टीकरण दिलं आहे. निवडणूक आयोगाने नेमकं काय म्हटलंय? सविस्तर जाणून घेऊयात...

हे वाचलं का?

हेही वाचा : राष्ट्रीय पातळीवर नाव कमावलेल्या कबड्डीपटूची दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या, नेमकं कारण काय?

जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी काढलेलं परिपत्रक जसंच्या तसं

नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या निवासावर १३० मतदार नोंदणीबाबत प्रसिद्ध झालेल्या बातमीसंदर्भात स्पष्टीकरण

दिनांक ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रसिद्ध झालेल्या काही वृत्तपत्रांमध्ये नवी मुंबई मनपा आयुक्तांच्या निवासावर १३० मतदारांची नोंदणी" अशी बातमी प्रकाशित झालेली आहे. सदर बातमीसंदर्भात मतदार नोंदणी अधिकारी, १५१-बेलापूर विधानसभा मतदारसंघ यांच्या अहवालानुसार ही बाव वास्तवाशी विसंगत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मतदार यादी भाग क्रमांक ३०० मध्ये "नेरुळ सेक्टर २१, नेरुळ रेल्वे स्टेशन, पेट्रोल पंप मार्ग, आयुक्त निवास" असे सेक्शनचे नाव नमूद आहे. येथे मनपा आयुक्त निवास" हे केवळ विभागाचा (सेक्शन) ठळक ओळखचिन्ह (Landmark) म्हणून नमूद करण्यात आलेले आहे. या यादीभागातील कोणत्याही मतदाराचा पत्तामध्ये / वर "नवी मुंबई महानगरपालिका आयुक्तांचे निवासस्थान" असे नमूद नाही. त्यामुळे संबंधित बातमीत नमूद केलेली १३० मतदारांची नोंदणी आयुक्तांच्या निवासावर झालेली आहे" ही माहिती वास्तवाशी विसंगत आहे.

मतदार यादी भाग क्रमांक १४८ संदर्भात वृत्तपत्रात नमूद करण्यात आलेल्या "सुलभ शौचालय" विषयक उल्लेखाबाबत तपास करण्यात आला असता, सदर ठिकाण दोन मजली असून पहिला व दुसरा मजला वास्तव्यासाठी वापरात असल्याचे निदर्शनास आले आहे. तेथील मतदार हे या पूर्वी त्या ठिकाणी वास्तव्यास होते, मात्र सध्या त्या तेवून स्थलांतरित झालेल्या असून विहित कार्यपद्धतीनुसार त्यांचे नाव वगळण्याची कार्यवाही सुरु आहे.

मतदार नोंदणी अधिकारी, १५१-बेलापूर विधानसभा मतदारसंघ यांच्या अहवालानुसार, वृत्तपत्रात प्रकाशित बातमीत कोणतेही प्रकारचे तथ्य आढळून नाही. असे जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी, ठाणे यांनी स्पष्ट केले आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

महायुती सरकारकडून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची फसवणूक? अजित पवारांच्या 'त्या' वक्तव्यामुळे चर्चेला उधाण

    follow whatsapp