राष्ट्रीय पातळीवर नाव कमावलेल्या कबड्डीपटूची दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या, नेमकं कारण काय?
kabaddi player Tejpal Singh shot dead : राष्ट्रीय पातळीवर नाव कमावलेल्या कबड्डीपटूची दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या, नेमकं कारण काय?
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
राष्ट्रीय पातळीवर नाव कमावलेल्या कबड्डीपटूची हत्या
कबड्डीपटू तेजपाल सिंगची गोळ्या झाडून हत्या, नेमकं कारण काय?
kabaddi player Tejpal Singh shot dead : पंजाबच्या जगरांव येथील हरी सिंग हॉस्पिटल रोडवर 26 वर्षीय कबड्डीपटू तेजपाल सिंह याची दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. जुन्या रागातून एका तरुणाने रिव्हॉल्व्हर काढून तेजपालच्या छातीवर गोळी झाडल्याची माहिती समोर आलीये. कबड्डीपटूचे साथीदार त्याला तात्काळ रुग्णालयात घेऊन गेले, मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. सोमवारी दुपारी जगरांवमध्ये ही दुर्दैवी घटना घडली. पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला असून आरोपींचा शोध सुरु आहे.
हेही वाचा : हादरवून टाकणारी बातमी.. महाराष्ट्र केसरी सिंकदर शेख सापडला अत्यंत भयंकर गुन्ह्यात, थेट पंजाबमध्ये अटक!
दोन गटात वाद झाल्यानंतर तेजपालवर गोळ्या झाडल्या
हरी सिंग हॉस्पिटल रोडवर एका तरुण कबड्डीपटूची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तेजपाल सिंह (वय 26) असं गोळीबारात मृत्यू झालेल्या कबट्टीपटूचे नाव आहे. तो बेट परिसरातील गिद्दडविंडी गावचा रहिवासी होता. मिळालेल्या माहितीनुसार, तेजपाल आपल्या दोन मित्रांसह हरी सिंग रोडवरील एका कारखान्याजवळ जात होता. तेव्हाच जुन्या वादाचा राग मनात ठेऊन दुसरा गट तिथे पोहोचला. दोन्ही गटांमध्ये वाद झाला. या दरम्यान एका तरुणाने रिव्हॉल्व्हर काढून तेजपालच्या छातीत गोळी झाडली. गोळी लागताच तेजपाल जमिनीवर कोसळला. तेजपालचे मित्र त्याला तातडीने गाडीत टाकून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले, मात्र डॉक्टरांनी तपासानंतर त्याला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच सिटी पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि सीआयए कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी परिसराला वेढा घालून तपास सुरू केला असून आरोपींच्या शोधासाठी चोख पावले उचलली आहेत.
आरोपींच्या अटकेसाठी विशेष पथक तयार
एसएसपी अंकुर गुप्ता यांनी सांगितले की, ही घटना जुन्या रागातून घडल्याचे दिसून येत आहे. पोलीस पथक लवकरच आरोपीला अटक करेल. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून दिवसाढवळ्या झालेल्या या खुनाने नागरिक हैराण झाले आहेत.










