'तुम्ही तरी या नाहीतर दुसऱ्या मुलीला पाठवा, हवं तर मी...', वासनांध डॉक्टरचे महिलेकडे 'ती' मागणी
Viral Audio Call : डॉ. अनिल कुमार यांनी एका महिला आरोग्य कर्मचाऱ्याशी आक्षेपार्ह संभाषण केल्याची ऑडिओ रेकॉर्डिंग सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. व्हायरल झालेल्या या ऑडिओमुळे आरोग्य विभागात एकच खळबळ माजली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
डॉक्टरने फोनद्वारे पीडितेकडे केली नको तिच मागणी
पीडित महिलेनं वरिष्ठ डॉक्टरांकडे केली तक्रार
नेमकं काय झालं?
Viral Audio Call: उत्तर प्रदेशातील सुल्तानपुर जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित होताना दिसत आहेत. लंभुआ सामुदायिक आरोग्य केंद्रातील डॉ. अनिल कुमार यांनी एका महिला आरोग्य कर्मचाऱ्याशी आक्षेपार्ह संभाषण केल्याची ऑडिओ रेकॉर्डिंग सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. व्हायरल झालेल्या या ऑडिओमुळे आरोग्य विभागात एकच खळबळ माजली आहे.
हे ही वाचा : 'संजय राऊत जी...' राऊतांच्या प्रकृतीची पंतप्रधान नरेंद्र मोदींना काळजी, 'x' ट्विटवरील पोस्ट चर्चेत
डॉक्टरने फोनद्वारे पीडितेकडे केली नको तिच मागणी
वृत्तमाध्यमाने दिलेल्या माहितीनुसार, डॉ. अनिल कुमारने फोनवरून पीडित महिलेला एकत्र फिरण्यासाठी, भेटण्यासाठी तसेच प्रेमाची मागणी केली होती. जेव्हा पीडित महिलेनं याचा विरोध केला असता, त्या डॉक्टरने दुसऱ्या मुलीची मागणी केली, तसेच जो काही पैसा लागेल तो मी देईन, असे डॉक्टर म्हणाला. संबंधित प्रकरणात महिलेनं डॉक्टरने केलेल्या मागणीला विरोध दर्शवला आणि नोकरी सोडेल, असं देखील पीडित महिला म्हणाली होती. संबंधित रेकॉर्डिंगमध्ये डॉक्टर 3 महिने घरी गेले नसल्याचं ऐकू येत असल्याची माहिती वृत्तमाध्यमांनी दिली.
पीडित महिलेनं वरिष्ठ डॉक्टरांकडे केली तक्रार
पीडित महिलेनं डॉ. अनिल कुमारने केलेल्या अशा कृत्याबाबतची डॉ. भरत भूषण यांच्याकडे तक्रारही केली. या तक्रारीच्या आधारे सीएमओने चौकशीसाठी एक पथक जारी केले. त्यांनी सांगितलं की, दोघांचेही जबाब नोंदवले जात आहेत. जबाबानंतर, नियमांनुसार, पुढील कारवाई केली जाणार आहे.
हे ही वाचा : पुणे : मला जो आई बनवेल त्याला 25 लाख, मोबाईलवर आली जाहिरात, पुण्यातील कंत्राटदाराला...
दरम्यान, 13 ऑक्टोबर रोजी डॉ. अनिल कुमार हे लंबुआ कम्युनिटी हेल्थ सेंटरमधून कादीपूर येथे बदली करण्यात आली होती. सीएचसीमध्ये वैद्यकीय निष्काळजीपणामुळे एका महिलेचा मृत्यू झाल्यानंतर आणि डॉक्टर घटनास्थळी दाखल न झाल्याने हे प्रकरण घडले. व्हायरल झालेल्या ऑडिओमुळे पुन्हा एकदा सरकारी आरोग्य संस्थांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.










