नारळपाणी विकणाऱ्या सलीमने छाटली डोंबिवलीच्या दयानंदची बोटं, करंगळी तर तुटलीच अन्...
डोंबिवलीमध्ये एका नारळ विक्रेत्याने एका रहिवाश्यावर थेट चाकूने हल्ला केला. ज्यामध्ये रहिवाशाच्या हाताची बोटं तुटली आहेत.
ADVERTISEMENT

डोंबिवली: डोंबिवलीतील एमआयडीसी परिसरात एम्स हॉस्पिटलसमोर घडलेल्या धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. नारळ विक्रीवरून झालेल्या किरकोळ वादाने अचानक रक्तरंजित वळण घेतले असून, एका फेरीवाल्याने स्थानिक रहिवाशावर जीवघेणा हल्ला केला. हल्ल्यात जखमी झालेल्या 58 वर्षीय दयानंद महादेव जतन यांच्या हाताच्या तीन बोटांना गंभीर दुखापत झाली असून, त्यांची करंगळी पूर्णपणे तुटली आहे. घटनेची माहिती मिळताच मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी नारळ विक्रेता सलीम सध्या फरार आहे. पोलिसांनी त्याचा शोध घेण्यासाठी तपास सुरू केला असून, स्थानिक व्यापारी आणि रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
घटनेची पार्श्वभूमी
घटना बुधवारी (30 ऑक्टोबर) दुपारी सुमारे 12 वाजता घडली. डोंबिवली एमआयडीसीतील मिलापनगर येथील रहिवासी दयानंद महादेव जतन हे एम्स हॉस्पिटलजवळील नारळ विक्रेता सलीम याच्याकडून नारळ खरेदी करण्यासाठी गेले होते. जतन यांना नारळ सुकलेला आणि खराब वाटला, म्हणून त्यांनी सलिमला, "तू सुकलेले, खराब नारळ का विकतोस?" असा सवाल केला. या सवालावरून दोघांमध्ये तीव्र वाद सुरू झाला. संतापलेल्या सलिमने अचानक जतन यांना धक्काबुक्की करत नारळ सोलण्याच्या चाकूने डाव्या हातावर वार केला.
हे ही वाचा>> स्मशानभूमीत नग्न अवस्थेत महिला करत होती 'ते' कृत्य! गावकऱ्यांनी पाहिलं अन् तिला मारहाण करत गावभर फिरवलं...
जतन यांनी बचाव करण्यासाठी चाकू पकडण्याचा प्रयत्न केला, पण सलिमने तो हिसकावून घेतल्याने हातावर गंभीर दुखापत झाली. डॉक्टरांच्या माहितीनुसार, जतन यांच्या हाताच्या तीन बोटांना गंभीर चाकूच्या जखमाही झाल्या असून, करंगळी पूर्णपणे तुटली आहे. हातातील स्नायू आणि रक्तवाहिन्यांना देखील इजा झाल्याने त्यांच्यावर तात्काळ शस्त्रक्रिया करण्यात आली. जखमी जतन यांना सहकाऱ्यांनी ताबडतोब एम्स हॉस्पिटलमध्ये दाखल केले, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
पोलीस कारवाई आणि तपास
घटनेनंतर जतन यांच्या कुटुंबीयांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी भारतीय न्याय संहितेनुसार जीवघेणा हल्ला आणि इतर संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपी सलीम हा डोंबिवली एमआयडीसी परिसरातच नारळ विक्री करणारा स्थानिक फेरीवाला आहे. घटनेनंतर तो घटनास्थळावरून पळून गेला असून, पोलिसांनी त्याचा शोध घेण्यासाठी तपास पथक तैनात केले आहे. सलीमचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत.










