स्मशानभूमीत नग्न अवस्थेत महिला करत होती 'ते' कृत्य! गावकऱ्यांनी पाहिलं अन् तिला मारहाण करत गावभर फिरवलं...

मुंबई तक

स्मशानभूमीत एक महिला नग्न अवस्थेत तांत्रिक विधी करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. मात्र, गावकऱ्यांनी तिला त्या अवस्थेत पाहिलं आणि तिला निर्दयी वागणूक दिल्याचं सांगितलं जात आहे.

ADVERTISEMENT

नग्न अवस्थेत महिला करत होती 'ते' कृत्य!
नग्न अवस्थेत महिला करत होती 'ते' कृत्य!
social share
google news

बातम्या हायलाइट

point

स्मशानभूमीत नग्न अवस्थेत महिला करत होती 'ते' कृत्य!

point

गावकऱ्यांनी महिलेला मारहाण करत गावभर फिरवलं...

Crime news: उत्तर प्रदेशातील महराजगंज जिल्ह्यातून एक चक्रावून टाकणारी बातमी समोर आली आहे. येथील स्मशानभूमीत एक महिला नग्न अवस्थेत तांत्रिक विधी करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. मात्र, गावकऱ्यांनी तिला त्या अवस्थेत पाहिलं आणि तिला निर्दयी वागणूक दिल्याचं सांगितलं जात आहे. गावातील लोकांनी त्या महिलेला बेदम मारहाण केली आणि गावभर नग्न अवस्थेत फिरवल्याचा सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर, पोलीस आता आरोपींना शोधण्याच्या प्रयत्नात आहे. 

नग्न अवस्थेत तांत्रिक पूजा...

ही घटना महराजगंज जिल्ह्यातील पनियरा पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावात घडली. येथे एका महिला दिवाळीच्या एक दिवस आधी गावाबाहेर असलेल्या स्मशानभूमीत तांत्रिक पूजा करत असल्याचं गावकऱ्यांनी पाहिलं. गावकऱ्यांना त्या महिलेच्या या कृत्याबाबत कळताच तिथे मोठ्या संख्येने लोक जमा झाले आणि त्यांनी महिलेवर हल्ला केला. इतकेच नव्हे तर त्या महिलेला पूर्ण गावभर नग्न अवस्थेत फिरवलं. संबंधित महिलेवर हल्ला करत तिच्यासोबत गैरवर्तन केल्याचा सुद्धा आरोप करण्यात आला आहे. 

हे ही वाचा: मुंबईत IT कंपनीतील महिला सहकाऱ्यावर मॅनेजरकडून बलात्कार! पत्नीने व्हिडीओ सुद्धा... ऑनलाइन मीटिंगमध्ये झाली ओळख

आत्महत्या करण्याचा सुद्धा प्रयत्न   

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याचं देखील पाहायला मिळतंय. आता पोलीस या प्रकरणातील आरोपींचा शोध घेत असल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेनंतर समाजाच्या भितीपोटी त्या महिलेने आत्महत्या करण्याचा सुद्धा प्रयत्न केला. मात्र, त्यावेळी तिच्या घरच्या सदस्यांनी तिला वाचवलं. आता पीडित महिला तिच्या नवऱ्यासोबत फरार असल्याचं सांगितलं जात आहे. 

हे ही वाचा: पीडित डॉक्टरला न्याय मिळवून देण्यासाठी बीडमधील आंदोलकांचा पेट्रोल ओतून घेण्याचा इशारा, सुषमा अंधारेंनी थांबवलं अन्...

पोलिसांचा तपास 

पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेची माहिती मिळताच पोलिसांच्या पथकाला घटनास्थळी पाठवण्यात आलं आहे. पोलिसांना अद्याप या प्रकरणाबाबत कोणतीच तक्रार मिळालेली नाही. घटनेतील पीडित महिला आणि तिचा पती गाव सोडून पळून गेल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेत सहभागी असलेल्या आरोपींची ओळख पटवली जात असून पोलीस आता त्याचा तपास करत आहेत. प्रकरणाची पुढील कारवाई केली जात असल्याची माहिती आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp