मुंबईत IT कंपनीतील महिला सहकाऱ्यावर मॅनेजरकडून बलात्कार! पत्नीने व्हिडीओ सुद्धा... ऑनलाइन मीटिंगमध्ये झाली ओळख
एका विमा कंपनीमध्ये काम करणाऱ्या मॅनेजरने त्याच कंपनीतील महिला सहकाऱ्यावर बलात्कार केल्याचं वृत्त समोर आलं आहे. आरोपी मॅनेजरने पीडितेला बेशुद्ध केलं आणि तिच्यासोबत घृणास्पद कृत्य केलं.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मुंबईत IT कंपनीतील महिला सहकाऱ्यावर मॅनेजरकडून बलात्कार!
आरोपीचं घृणास्पद कृत्य अन् पत्नीने व्हिडीओ सुद्धा बनवला...
Mumbai Crime: मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका विमा कंपनीमध्ये काम करणाऱ्या मॅनेजरने त्याच कंपनीतील महिला सहकाऱ्यावर बलात्कार केल्याचं वृत्त समोर आलं आहे. आरोपी मॅनेजरने पीडितेला बेशुद्ध केलं आणि तिच्यासोबत घृणास्पद कृत्य केलं. या दरम्यान, आरोपीच्या पत्नीने संपूर्ण घटनेचा अश्लील व्हिडीओ बनवला. त्यानंतर, संबंधित जोडप्याने पीडित महिलेला ब्लॅकमेल केलं आणि तिच्याकडे लाखो रुपयांची मागणी केली. ही घटना मुंबईतील पनवेल येथे घडल्याची माहिती आहे.
ऑनलाइन मीटिंगमध्ये झाली ओळख
पोलिसांच्या माहितीनुसार, एका ऑनलाइन मीटिंगमध्ये आरोपी मॅनेजरची पीडितेसोबत ओळख झाली होती. एके दिवशी, पीडित महिला मुंबईला आल्यानंतर मॅनेजरने तिला त्याच्या घरी बोलवलं आणि तिथे थांबण्यास सांगितलं. या प्रकरणातील आरोपी तरुणाची ओळख प्रदीप नामदेव नारले अशी समोर आली असून तो अंधेरीतील एका बिमा कंपनीमध्ये शाखा व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहे. त्याची पत्नी रेणुका नारले आणि भाऊ प्रवीण नारले हे दोघे या घटनेत सह-आरोपी असून सध्या दोघेही फरार असल्याची माहिती आहे. दरम्यान, आरोपीची एका ऑनलाइन मीटिंगमध्ये नागपुरच्या शाखेत काम करणाऱ्या महिला सहकाऱ्याशी झाली.
हे ही वाचा: Govt Job: कोणत्याही परीक्षेशिवाय मिळवा रेल्वेत नोकरी! लवकरच करा अर्ज... काय आहे पात्रता?
महिला सहकाऱ्यावर बलात्कार...
कामानिमित्त झालेली ही ओळखीचं नंतर दोघांमधील चांगल्या मैत्रीत रुपांतर झालं आणि दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. पनवेलमधील कॉर्पोरेट क्षेत्रात उच्च पदावर मॅनेजर म्हणून कार्यरत असणाऱ्या आरोपीने कंपनीतील महिला सहकाऱ्यावर बलात्कार केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
हे ही वाचा: बनावट आधार कार्ड प्रकरणी रोहित पवारांवर गुन्हा दाखल, पहिली प्रतिक्रिया देताना संतापले, म्हणाले...
पत्नीने बनवला अश्लील व्हिडीओ
27 मार्च रोजी, आरोपी मॅनेजरने मुंबईत कामानिमित्त आलेल्या पीडित महिलेला पनवेल येथील त्याच्या घरी बोलावलं. नंतर, पाहुणचाराच्या बहाण्याने आरोपीने पीडित महिलेला जेवणात विष मिसळून ते खायला दिलं. यामुळे ती महिला बेशुद्ध झाली आणि बेशुद्ध अवस्थेत असताना आरोपीने पीडितेचं लैंगिक शोषण केलं. धक्कादायक बाब म्हणजे, आरोपीच्या पत्नीने पतीच्या घाणेरड्या कृत्याचा व्हिडीओ बनवला. पोलीस आता आरोपींचा शोध घेत असून पोलिसांनी पीडित महिलेच्या तक्रारीच्या आधारे संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.










