'मुख्यमंत्री व्हायचं म्हणून लाचारी, चाटूगिरी...' राज ठाकरे चिडले, शिंदेंवर बोचरी टीका

मुंबई तक

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पक्षाच्या मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका केली आहे. पाहा नेमकं काय म्हणाले राज ठाकरे.

ADVERTISEMENT

eknath shinde helplessness continues to become the chief minister raj thackeray blunt criticism of shinde
राज ठाकरेंची उपमुख्यमंत्री शिंदेंवर टीका
social share
google news

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या मेळाव्यात भाषण करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार तोफ डागली आहे. 'मुख्यमंत्री पद हवं यासाठी एकनाथ शिंदे लाचारी करत आहेत. त्यासाठीच पंतप्रधानांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रातील किल्ल्यांवर नमो टूरिझम सेंटर सुरू करणार आहेत.' असं म्हणत राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेवर अत्यंत जहरी टीका केली. 

राज्यातील मतदारांच्या यादीतील घोळ, ईव्हीएम घोटाळा, मतचोरी अशा अनेक मुद्द्यांवरून 1 नोव्हेंबर 2025 रोजी विरोधकांकडून मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. त्याच्याच तयारीसाठी मनसेकडून आज (30 ऑक्टोबर) मुंबईत मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. याच मेळाव्यात बोलताना राज ठाकरेंनी उपमुख्यमंत्री शिंदेंवर जोरदार टीका केली.

राज ठाकरेंची शिदेंवर जहरी टीका

'सत्तेत आल्यावर वेडंवाकडं कसंही वागायचं.. सगळ्या शहरांवर त्यांचा डोळा आहे. बाकीचे सगळे तर गेलेच आहेत घरंघळत. आजची बातमी.. आजची बातमी.. म्हणजे किती स्वाभिमान गहाण टाकायचा याला काही मर्यादा? म्हणजे हा विचार मनात येतो कसा? काही बातम्या आल्या आहेत. ज्याचा जीआर देखील आला आहे. हे एकनाथ शिंदेचं खातं..'

हे ही वाचा>> 'कसली चाटूगिरी चालुये... सत्ता असो नसो फोडून टाकणार', राज ठाकरेंचा एकनाथ शिंदेवर जहरी टीका

'काय करतायेत हे जर ऐकाल ना.. नाही तुमची तळपायाची आग मस्तकात गेली तर सांगाल मला.. नरेंद्र मोदींच्या 75 व्या वाढदिवशीनिमित्त पर्यटन विभाग महाराष्ट्रात पर्यटनांची काही ठिकाणी काढत आहेत. त्याची केंद्र.. त्याला नाव काय दिलंय.. नमो टूरिझम सेंटर्स..' 

हे वाचलं का?

    follow whatsapp