मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिंदेंची शिवसेना किती जागा लढणार? मंत्र्यांच्या बैठकीतून आकडा समोर

ऋत्विक भालेकर

Mumbai Municipal Corporation election : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिंदेंची शिवसेना किती जागा लढणार? याबाबत एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या शिवसेना मंत्र्यांच्या बैठकीत चर्चा झाली आहे.

ADVERTISEMENT

 Mumbai Municipal Corporation election
Mumbai Municipal Corporation election
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिंदेंची शिवसेना किती जागा लढणार?

point

शिवसेना मंत्र्यांच्या बैठकीतून निवडणुकीबाबत सविस्तर चर्चा

मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन निवासस्थानी मंगळवारी रात्री झालेल्या शिवसेना (शिंदे गट) मंत्र्यांच्या बैठकीत मुंबई महापालिका निवडणुकीसाठी रणनीती आखण्यात आली. या बैठकीत शिवसेना मंत्र्यांच्या कामाचा आढावा घेऊन आगामी निवडणुकीत पक्ष किती जागांवर लढणार याबाबत प्राथमिक चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. 2017 च्या मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेने जिंकलेल्या सर्व जागा शिंदे गटाला मिळाव्यात, अशी ठाम मागणी बैठकीत करण्यात आली. मुंबई महापालिकेची शेवटची निवडणूक 2017 मध्ये झाली होती. दरम्यान, शिवसेनेत फुट पडल्यानंतर 2017 मध्ये निवडून आलेल्या 50 ते 60 नगरसेवकांनी शिंदे गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. हे नगरसेवक पक्षासाठी निवडणुकीत प्रभावी ठरणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंची शिवसेना मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत 100 जागा लढण्यासाठी आग्रही आहे.

शिंदेंची शिवसेना 100 जागा लढण्यासाठी आग्रही

सध्या भाजपकडे 82 ते 85 नगरसेवक आहेत. शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप एकत्र आल्यास त्यांचे एकूण संख्याबळ सुमारे 145 इतके होते. एकूण 227 जागांपैकी उर्वरित 82 जागांबाबत दोन्ही पक्षांमध्ये समान वाटप व्हावे, अशीही मागणी शिंदे गटाने केली आहे. या आकडेवारीनुसार विचार केल्यास शिवसेना (शिंदे गट) मुंबई महापालिकेत सुमारे 100 जागांवर उमेदवार उभे करण्याच्या तयारीत आहे, तर भाजपकडे सुमारे 127 जागा राहतील. दरम्यान, अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस गट जर महायुतीसोबत आला, तर त्यांना किती जागा दिल्या जाणार याबाबत मात्र अद्याप निर्णय झालेला नाही. राज्यातील राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेची निवडणूक महायुतीसाठी प्रतिष्ठेची ठरणार आहे. त्यामुळे या बैठकीत घेतलेले निर्णय आगामी निवडणुकीच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल मानले जात आहेत.

काँग्रेसकडून स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी सुरु

आगामी मुंबई महापालिका निवडणूक महाविकास आघाडी एकत्रपणे लढणार की नाही? याबाबतचा प्रश्न अजूनही कायम आहे. कारण मुंबई काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी सुरु केली आहे. इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून गेल्या दोन दिवसांत तब्बल 100 हून अधिक अर्ज वाटप करण्यात आले आहेत. मुंबई काँग्रेसतर्फे संभाव्य उमेदवारांना अर्जाचे नमुने देण्यात आले असून, त्यात इच्छुकांनी आपले नाव, वय, लढवायचा वार्ड, जात श्रेणी (ओपन/एससी/एसटी), आतापर्यंत केलेली कामे, पक्षातील योगदान आणि इतर आवश्यक माहिती नमूद करण्यास सांगितले आहे. या अर्जांच्या आधारे इच्छुक उमेदवारांची छाननी करून अंतिम उमेदवारांची निवड केली जाणार आहे. दरम्यान, काँग्रेसच्या या हालचालींमुळे मविआमध्ये नव्या चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, महापालिका निवडणुकीपूर्वी ठाकरे बंधू एकत्र लढणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र, मनसेला महाविकास आघाडीत घेण्याबाबत काँग्रेसकडून अद्याप स्पष्टपणे भूमिका घेण्यात आलेली नाही.

हे वाचलं का?

    follow whatsapp