4 बाळांना आईने बाथरुममध्ये दिला जन्म, कपाटात टॉवेलमध्ये गुंडाळलेल्या अवस्थेत आढळले मृतदेह, आईनं नेमकं काय केलं?

मुंबई तक

crime news : मुलांना जन्म देणार्‍या आईने स्वत:चं जीवन संपवल्याची दुर्दैवी घटना आहे. एवढेच  नाही तर, त्या लहान मुलांची हत्या करत तिच्या मृतदेहासोबत वर्षानुवर्षे एकाच घरात राहत असल्याचा धक्कादायक प्रकार आता समोर आला आहे.

ADVERTISEMENT

crime news
crime news
social share
google news

बातम्या हायलाइट

point

 बाळाला शौचालयात जन्म दिला

point

टवेलमध्ये गुंडाळलेल्या अवस्थेत नवजात बाळ 

point

चारही बाळाचे मृतदेह

Crime News : मुलांना जन्म देणार्‍या आईने लहान मुलांची हत्या करत मृतदेहासोबत वर्षानुवर्षे एकाच घरात राहत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. हत्या करणाऱ्या आईचे नाव जेसिका माउथे (वय 39) असे आहे. जेसिकाने तिच्या चार मुलांचे मृतदेह तिच्याच घरात लपवले होते. एका नवजात कचऱ्यांच्या पिशव्यांमध्ये गुंडाळलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. शिवाय, तिने आणखी तीन नवजात बाळांचे मृतदेह अटारीत लपवले होते.

हे ही वाचा : पुण्याची गोष्ट : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधीच महिला नेत्या सक्रिय, राजकीय वातावरण चांगलंच तापले

टॉवेलमध्ये गुंडाळलेल्या अवस्थेत नवजात बाळ 

काही आठवड्यांपूर्वी जेसिकाला तिच्या घरामालकाने घर रिकामे करण्यासाठी नोटीसा जाहीर केल्या असता, हे प्रकरण उघडकीस आले. घरमालक त्याच्या सामानाची तपासणी करण्यासाठी आला तेव्हा कपाटातील टॉवेलमध्ये कचऱ्याच्या पिशव्यांमध्ये गुंडाळलेल्या अवस्थेत नवजात बाळाचा मृतदेह आढळला. त्याने पोलिसांना बोलावले आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता, लॉफ्टमध्ये टोट बॅग आणि बादल्यांमध्ये लपवलेले आणखी तीन नवजात बाळांचे मृतदेह आढळले. याचपार्श्वभूमीवर जेसिकाला न्यायालयात हजर करण्यात आले आणि तिने सर्व आरोप फेटाळून लावले. 

तिने बाथरूममध्ये बाळांना जन्म दिला नंतर...

या प्रकरणात पोलिसांनी सांगितले की, तिने बाथरूममध्ये बाळांना जन्म दिला होता. पहिल्या बाळाबद्दल, तिने सांगितलं की, तिच्या कानावर कसलातरी आवाज ऐकू आला, नंतर ती बेशुद्ध अवस्थेत पडली होती. जेव्हा ती शुद्धीवर आली तेव्हा बाळ मृत पावले होते. दुसऱ्या आणि तिसऱ्या बाळाबद्दल विचारले असता, तिने सांगितलं की कदाचित ते बाळ मृत जन्माला आले असतील कारण त्यांनी आवाज ऐकला नाही.

 बाळाला शौचालयात जन्म दिला

चौथ्या बाळाची कहाणी थोडी वेगळी आहे. पोलिसांनी सांगितलं की, तिने चौथ्या बाळाला शौचालयात जन्म दिला आणि बाळही जिवंत होते. तिने मुलाचे रडणं ऐकलं पण, काही मिनिटे त्याला तिथेच सोडण्यात आले. नंतर, तिने मुलाला बाहेर काढले आणि एका टॉवेलमध्ये गुंडाळले. ते बाळ शांत होईपर्यंत सुमारे 15-20 मिनिटे आपल्याच मांडीवर होते. तिने सांगितले की, तिला माहिती नव्हते की, बाळाचा मृत्यू तिच्या हातून झाला. तिने त्याचे तोंड आणि नाक झाकले होते. 

हे वाचलं का?

    follow whatsapp