LIVE: भयंकर.. मुंबईला हादरवणारी घटना! दिवसाढवळ्या स्टुडिओमध्ये 15-20 मुलं ओलीस.. अॅक्टिंग स्टुडिओबाहेर दहशत
मुंबईत 15 ते 20 मुलांचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. RA स्टुडिओच्या पहिल्या मजल्यावर मुलांना ओलीस ठेवण्यात आले होते, जिथे अभिनयाचे वर्ग घेतले जातात.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पवई परिसरात एका व्यक्तीने काही मुलांना बनवलं बंधक
आरोपी व्यक्ती मानसिक आजारी असल्याची माहिती
मुलांना ओलीस ठेवल्याच्या बातमीने मोठी खळबळ
दीपेश त्रिपाठी, मुंबई: मुंबईत आज (30 ऑक्टोबर) एक खळबळजनक घटना घडली आहे. मुंबईतील पवई भागात दिवसाढवळ्या मुलांचे अपहरण झाल्याचं समोर आलं आहे. ज्याप्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना पवईतील रा स्टुडिओमध्ये घडली आहे. जिथे पहिल्या मजल्यावर अभिनयाचे वर्ग घेतले जातात. मिळालेल्या माहितीनुसार,सकाळी सुमारे 100 मुले ऑडिशन्ससाठी आली होती. दरम्यान, स्टुडिओमध्ये काम करणारा आणि युट्यूब चॅनल चालवणारा रोहित नावाच्या एका तरूणाने 15 ते 20 मुलांना ओलीस ठेवलं. ज्यानंतर एकच खळबळ माजली
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी रोहित हा गेल्या 4 ते 5 दिवसांपासून याच स्टुडिओमध्ये ऑडिशन्स घेत होता. आज त्याने सुमारे 80 मुलांना परत पाठवले, परंतु उर्वरित मुलांना एका खोलीत बंद करून ठेवलं. ज्यानंतर मुलं खिडक्यांमधून बाहेर डोकावताना दिसली. या सगळ्या प्रकाराने जवळच्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
हे ही वाचा>> मुंबईत IT कंपनीतील महिला सहकाऱ्यावर मॅनेजरकडून बलात्कार! पत्नीने व्हिडीओ सुद्धा... ऑनलाइन मीटिंगमध्ये झाली ओळख
स्टुडिओमध्ये 15 ते 20 मुलं ओलीस
माहिती मिळताच मोठा पोलीस फौजफाटा हा घटनास्थळी दाखल झाला. त्यानंतर पोलिसांनी स्टुडिओला वेढा घातला. त्यानंतर पोलिसांनी आरोपीची ओळख आणि या कृत्यामागचा हेतू शोधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. आरोपींच्या मागण्या काय आहेत हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
हे ही वाचा>> नवी मुंबईतील फार्महाऊसच्या बाथरूममध्ये स्पाय कॅमेरा... मॅनेजरच्या मोबाईलमध्ये सापडले महिलांचे 17 घाणेरडे व्हिडीओ!
पोलिसांनी स्टुडिओला घातला वेढा
सध्या स्टुडिओबाहेर हायअलर्ट आहे आणि पोलीस अधिकारी मुलांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी सतत नियोजन करत आहेत. पोलीस आणि बचाव पथके मुलांच्या सुरक्षिततेसाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत.










