आम्हाला निवडून यायचं होतं, म्हणून आम्ही कर्जमाफीचं आश्वासन दिलं, अजित पवारांचं वक्तव्य

मुंबई तक

Ajit Pawar on Maharashtra Farmer loan waiver : महायुती सरकारकडून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची फसवणूक? अजित पवारांच्या 'त्या' वक्तव्यामुळे चर्चेला उधाण

ADVERTISEMENT

Ajit Pawar on Maharashtra Farmer loan waiver
Ajit Pawar on Maharashtra Farmer loan waiver
social share
google news

बातम्या हायलाइट

point

महायुती सरकारकडून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची फसवणूक?

point

अजित पवारांच्या 'त्या' वक्तव्यामुळे चर्चेला उधाण

Ajit Pawar on Maharashtra Farmer loan waiver, Pune : "शून्य टक्के व्याजाने पैसे दिल्यानंतर तुम्ही वेळच्या वेळी कर्ज फेडण्याची सवय लावून घ्यायला हवी. सारखेच फुकटात आणि सारखेच माफ करा म्हटल्यावर कसे व्हायचे? असे चालत नाही. एकदा साहेबांनी (शरद पवार) कर्जमाफी दिली, एकदा देवेंद्रजींनी दिली तसेच मी उद्धवजींच्या सरकारमध्ये असताना एकदा दिली. आता पुन्हा आम्हाला निवडून यायचे होते म्हणून आम्ही सांगितले आम्ही माफ करू, आम्ही माफ करू", असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आहेत. ते इंदापूरमध्ये बोलत होते. अजित पवारांच्या या वक्तव्यामुळे महायुती सरकारने कर्जमाफीचे आश्वासन देऊन महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची फसवणूक केलीये का? असा सवाल उपस्थित होतोय.

सारखीच मदत दिली जाणार नाही- अजित पवार 

शेतकऱ्यांच्या मदतीबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, “शक्य तेथे आम्ही तुम्हाला जिल्हा बँक, डीपीडीसी, जिल्हा परिषद आणि राज्य सरकारच्या माध्यमातून मदत करू. मात्र, सतत या प्रकारची मदत दिली जाणार नाही. शेतकऱ्यांनी स्वतःही पुढाकार घेणे गरजेचे आहे, शेतकऱ्यांनीही हातपाय हलवले पाहिजेत. हे सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे.”

हेही वाचा : Encounter झालेल्या रोहित आर्याच्या मनात होती 'ती' गोष्ट, मराठी अभिनेत्रीच्या WhatsApp चॅटने उडवली खळबळ

हे वाचलं का?

    follow whatsapp