मुलीच्या प्रेमसंबंधाला आईचा विरोध, प्रियकर आणि मित्रांसोबत मिळून काटा काढला अन् आत्महत्या दाखवण्याचा प्रयत्न...
एका तरुणीने तिच्या प्रियकरासोबत मिळून आपल्या आईची हत्या केल्याची मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. आरोपी तरुणीने तिच्या प्रियकर आणि मित्रांसोबत मिळून आपल्या आईला संपवलं
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मुलीच्या प्रेमसंबंधाला आईचा विरोध
प्रियकर आणि मित्रांसोबत मिळून काटा काढला
हत्येला आत्महत्या दाखवण्याचा प्रयत्न...
Crime News: एका तरुणीने तिच्या प्रियकरासोबत मिळून आपल्या आईची हत्या केल्याची मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. आरोपी तरुणीने तिच्या प्रियकर आणि मित्रांसोबत मिळून आपल्या आईला संपवलं आणि ती हत्या आत्महत्या दाखवण्याचा प्रयत्न केल्याची माहिती आहे. पोलिसांच्या तपासात ही धक्कादायक घटना उघडकीस आली. संबंधित घटना ही बंगळुरूच्या उत्तराहल्ली परिसरात घडली.
नेमकं प्रकरण काय?
घटनेतील मृत महिला ही एक लोन रिकव्हरी कंपनीमध्ये हेल्पर म्हणून काम करायची आणि ती तिच्या पतीपासून वेगळी आपल्या मुलीसोबत एकटीच राहायची. पीडित महिलेचं नाव नेत्रावती असल्याची माहिती आहे. पीडितेची मुलगी ही 17 वर्षीय असून 10 वी नापास असून तिचं तिच्या मावशीच्या मुलाच्या मित्रावर प्रेम होतं. मावशीचा मुलाचा मित्र असल्याने तिच्या प्रियकराचं तिच्या घरी सतत येणं-जाणं असायचं. एके दिवशी, नेत्रावतीला तिच्या मुलीच्या अफेअरबद्दल कळलं आणि तिने त्या नात्याला विरोध केला. त्याने तिच्या मुलीच्या प्रियकराला सुद्धा घरात येण्यापासून रोखलं. जर त्याने पुन्हा मुलीशी बोलण्याचा प्रयत्न केला तर पोलिसांना बोलावण्याची धमकी सुद्धा तिने दिली.
आईचा काटा काढण्याचा कट
याच गोष्टीवरून पीडितेची मुलगी आणि तिचा प्रियकर अतिशय संतापले. 24 ऑक्टोबर रोजी संबंधित मुलीने एका मॉलमध्ये तिच्या प्रियकर आणि मित्रांना भेटण्यासाठी बोलवलं. त्यावेळी, आरोपी मुलीने तिच्या आईचा काटा काढण्याचा कट रचला. आपली आई रात्री दारू पिऊन लवकर झोपून जाते, त्यामुळे त्यावेळी घरी जाणं सोपं असल्याचं तिने तिच्या साथीदारांना सांगितलं.
हे ही वाचा: ठाणे: 'त्या' कारणावरून वाद झाला अन् भाच्याने स्वत:च्या मामालाच संपवलं... CCTV मध्ये घटना कैद
हत्येनंतर, आत्महत्या दाखवण्याचा प्रयत्न
25 ऑक्टोबर रोजी रात्री 9 वाजताच्या सुमारास, आरोपी तरुणी तिच्या प्रियकर, तीन मित्र आणि 13 वर्षांच्या चुलत भावासोबत घरी पोहोचली. नेत्रावतीने त्यांना सर्वांना पाहिलं आणि रागाच्या भरात तिच्या प्रियकराचा मोबाईल फोन हिसकावून घेतला. तिने पोलिसांना फोन करण्याची धमकी सुद्धा दिली. तेव्हा आरोपींनी त्या महिलेला पकडलं आणि टॉवेलने तिचा गळा दाबून हत्या केली. हत्येनंतर, आरोपींनी ती आत्महत्या दाखवण्याचा प्रयत्न केला. आरोपींनी खोलीत जाऊन नेत्रावतीचा मृतदेह पंख्याला लटकवला आणि दरवाजा बंद केला. त्यानंतर, ती मुलगी तिच्या प्रियकरासोबत तिथून पळून गेली.










