'मतदार यादीत एकाचा पत्ता सुलभ शौचालयाचा', राज ठाकरेंचं वक्तव्य; आता निवडणूक आयोगाकडून स्पष्टीकरण
Election Commission on Raj Thackeray statement : 'मतदार यादीत एकाचा पत्ता सुलभ शौचालयाचा', राज ठाकरेंचं वक्तव्य; आता निवडणूक आयोगाकडून स्पष्टीकरण
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
'मतदार यादीत एकाचा पत्ता सुलभ शौचालयाचा', राज ठाकरेंचं वक्तव्य
आता निवडणूक आयोगाकडून स्पष्टीकरण
Election Commission on Raj Thackeray statement : "नवी मुंबई आयुक्तांच्या बंगल्यावर शंभरहून अधिक लोकांची नोंदणी आहे. एकाचा पत्ता सुलभ शौचालय आहे, काय बसल्या बसल्या सही घेतली काय?", असा सवाल उपस्थित करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मतदार याद्यांतील बोगसपणावर भाष्य केलं होतं. यासंबंधित बातम्या आता निवडणूक आयोगापर्यंत पोहोचल्या आहेत. निवडणूक आयोगाने म्हणजेच जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, ठाणे यांनी याबाबत परिपत्रक काढून स्पष्टीकरण दिलं आहे. निवडणूक आयोगाने नेमकं काय म्हटलंय? सविस्तर जाणून घेऊयात...
हेही वाचा : राष्ट्रीय पातळीवर नाव कमावलेल्या कबड्डीपटूची दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या, नेमकं कारण काय?
जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी काढलेलं परिपत्रक जसंच्या तसं
नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या निवासावर १३० मतदार नोंदणीबाबत प्रसिद्ध झालेल्या बातमीसंदर्भात स्पष्टीकरण
दिनांक ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रसिद्ध झालेल्या काही वृत्तपत्रांमध्ये नवी मुंबई मनपा आयुक्तांच्या निवासावर १३० मतदारांची नोंदणी" अशी बातमी प्रकाशित झालेली आहे. सदर बातमीसंदर्भात मतदार नोंदणी अधिकारी, १५१-बेलापूर विधानसभा मतदारसंघ यांच्या अहवालानुसार ही बाव वास्तवाशी विसंगत असल्याचे स्पष्ट झाले आहे.










