महाराष्ट्र केसरी ते थेट शस्त्र तस्करी.. पोलिसांच्या जाळ्यात सापडलेला सिकंदर शेख आहे तरी कोण?
Who is Sikandar Sheikh: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख याला पंजाबमध्ये शस्त्र तस्करी प्रकरणात अटक करण्यात आली आहे. जाणून घ्या सिकंदरविषयी सविस्तर.
ADVERTISEMENT

सोलापूरः महाराष्ट्र केसरी असलेला सिंकदर शेख याला पंजाबमध्ये शस्त्र तस्करी प्रकरणी अटक करण्यात आली आहे. दरम्यान, त्याच्या अटकेचे वृत्त समजताच कुस्ती क्षेत्रासह महाराष्ट्रातील अनेकांना धक्का बसला. जाणून घ्या कोण सिकंदर शेख.
कोण आहे सिकंदर शेख?
सिकंदर शेख हा महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील रहिवासी असलेला २६ वर्षांचा तरुण आहे. तो एक राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू (national-level wrestler) म्हणून ओळखला जातो आणि "महाराष्ट्र केसरी" ही पदवी त्याच्या कुस्तीतील यशामुळे मिळाली. मात्र, या क्रीडाविषयक यशाच्या विरुद्ध, तो आता गुन्हेगारी जगात गुंतलेला असल्याचे समोर आले आहे.
‘त्या’ कुस्तीच्या सामन्यामुळे महाराष्ट्रात झालेली सिकंदरची चर्चा
महाराष्ट्र केसरी 2023 (Maharashtra Kesari) ची गदा ही पैलवान सिकंदर शेख (Sikandar Shaikh) हाच पटकवणार अशी चर्चा अवघ्या महाराष्ट्रात होती. कारण आजवर अनेक बड्या-बड्या मल्लांना आस्मान दाखवणारा सिकंदर हा प्रचंड ताकदीचा होता. पण उपांत्य फेरीत एक अशी घटना घडली की सिकंदरसह अवघ्या महाराष्ट्रालाही धक्का बसला होता. अगदी शेवटच्या क्षणी पंचानी प्रतिस्पर्धी मल्लाला 4 गुण दिल्याने सिंकदरचा पराभव झालेला. यानंतर अवघ्या महाराष्ट्रातून या निर्णयावर प्रचंड टीका झाली होती. याच सामन्यानंतर सिंकदर अवघ्या महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरला होता.
सिकंदरला अटक










