Encounter झालेल्या रोहित आर्याच्या मनात होती 'ती' गोष्ट, मराठी अभिनेत्रीच्या WhatsApp चॅटने उडवली खळबळ

विद्या

Rohit Arya and Ruchita Jadhav: पवईतील अपहरण प्रकरणातील आरोपी रोहित आर्याचा पोलीस गोळीबारात मृत्यू झाल्यानंतर एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ज्याबाबत मराठी अभिनेत्री एक पोस्ट शेअर केली आहे.

ADVERTISEMENT

rohit arya who was killed in an encounter had also called marathi actress ruchita jadhav for audition actress showed her whatsApp chat
मराठी अभिनेत्रीचे रोहित आर्यासोबतचे WhatsApp चॅट आले समोर
social share
google news

मुंबई: मुंबईच्या पवईतील आरए स्टुडिओमध्ये गुरुवार दुपारी (३० ऑक्टोबर २०२५) घडलेल्या भयानक अपहरणकांडाने संपूर्ण शहर हादरून गेलेलं. स्वतःला चित्रपट निर्माता म्हणवणारा रोहित आर्या याने 10 मुलांना एका स्टुडिओ बंधक बनवलं होतं. पोलिसांनी मुलांच्या सुटकेसाठी केलेल्या कारवाईत रोहित आर्यावर गोळीबार करण्यात आला. ज्यामध्ये त्याचा मृत्यू झाला, तर सर्व बंधक सुखरूप सुटले. या घटनेनंतर आता एक आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे. रोहित आर्याने काल एका मराठी अभिनेत्रीला देखील या स्टुडिओमध्ये ऑडिशनसाठी बोलावलं होतं. ज्याबाबतचे व्हॉट्सअॅप चॅटच त्या अभिनेत्री आता समोर आणले आहेत. जेव्हा रोहित आर्याने केलेलं अपहरण आणि एन्काउंटरमध्ये त्याचा झालेला मृत्यू या गोष्टी समोर आल्या तेव्हा या अभिनेत्रीला मोठा धक्का बसला.

रोहित आर्या ज्या अभिनेत्रीला स्टुडिओमध्ये बोलवत होता तिचं नाव रुचिता जाधव असं आहे. तिने याबबात काही  ही  भावनिक पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केल्या आहेत. ज्यामध्ये तिने सांगितलं की, रोहित आर्याने काही आठवड्यांपूर्वी एका 'होस्टेज' विषयक चित्रपटासाठी तिला बोलावलं होतं. पण काही कारणाने ही मीटिंग रद्द झाल्याने ती थोडक्यात बचावली. या घटनेने कामाच्या निमित्ताने नवीन लोकांना भेटताना सतर्क राहण्याची गरज असल्याचंही तिने यावेळी म्हटलं आहे.

रुचिता जाधव म्हणते, थोडक्यात बचावली

या घटनेच्या काही आठवड्यांपूर्वी रोहित आर्याने मराठी अभिनेत्री रुचिता जाधव हिच्याशी संपर्क साधला होता. 4 ऑक्टोबरला त्याने स्वतःला चित्रपट निर्माता असल्याचं तिला सांगितलं आणि 'होस्टेज सिच्युएशन'वर आधारित चित्रपटाची कल्पना सांगितली. अभिनेत्री म्हणून रुचिताने संभाषण पुढे चालू ठेवलं. २३ ऑक्टोबरला आर्याने २७, २८ किंवा २९ ऑक्टोबरला भेटण्याची विनंती केली. रुचिताने २८ तारखेला होकार दिला. २७ ऑक्टोबरला त्याने पवईतील स्टुडिओचा पत्ता पाठवला आणि दुसऱ्या दिवशी येण्याची विनंती केली.

हे ही वाचा>> "एअरगनने त्याने आधी फायर केलं..." रोहित आर्या केससंबंधी मुंबई पोलिसांची माहिती... स्टुडिओच्या आत नेमकं काय घडलं?

पण काही कौटुंबिक कारणामुळे रुचिताने ही मीटिंग रद्द केली. ३१ ऑक्टोबरला बातम्या पाहिल्यानंतर तिला आर्याचं नाव ओळखीचं वाटलं. ज्यानंतर इन्स्टाग्राम स्टोरीवर तिने भावनिक पोस्ट लिहिली: "मी थरथर कापत आहे. त्या दिवशी गेली असती तर काय झालं असतं? देव आणि कुटुंबीयांचे आभार. कामाच्या निमित्ताने नवीन लोकांना भेटताना अतिशय सतर्क राहा आणि कुटुंब किंवा मित्रांना कळवा."

हे वाचलं का?

    follow whatsapp