Govt Job: टॉप क्लास अधिकारी बनण्याची सुवर्णसंधी! SEBI च्या 'या' भरतीसाठी लवकरच करा अर्ज...

भारतीय प्रतिभूति और विनिमय बोर्ड (SEBI) म्हणजेच 'सेबी'कडून ऑफिसर ग्रेड A असिस्टंट मॅनेजर पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

SEBI च्या 'या' भरतीसाठी लवकरच करा अर्ज...

SEBI च्या 'या' भरतीसाठी लवकरच करा अर्ज...

मुंबई तक

• 12:45 PM • 31 Oct 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

टॉप क्लास अधिकारी बनण्याची सुवर्णसंधी!

point

SEBI मध्ये निघाली मोठ्य पदांसाठी भरती

Govt Job: अधिकारी पदावरील सरकरी नोकरीच्या प्रयत्नात असणाऱ्या तरुणांसाठी चांगली संधी उपलब्ध झाली आहे. भारतीय प्रतिभूति और विनिमय बोर्ड (SEBI) म्हणजेच 'सेबी'कडून ऑफिसर ग्रेड A असिस्टंट मॅनेजर पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी 30 ऑक्टोबर म्हणजेच कालपासूनच अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून उमेदवार 28 नोव्हेंबर पर्यंत अर्ज करू शकतात. त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवार लवकरच अधिकृत वेबसाइटवर जाऊन या भरतीसाठी अर्ज करू शकतात. 

हे वाचलं का?

भारतीय प्रतिभूति और विनिमय बोर्ड (SEBI) ही भारत सरकारची फायनान्शियल म्हणजेच आर्थिक रेग्युलेटरी संस्था असून त्याचा मुख्य उद्देश शेअर बाजारातील गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करणे आणि शेअर बाजाराच्या विकासाला चालना देणे आहे. या भरतीच्या माध्यमातून उमेदवार भारत सरकारच्या या मोठ्या संस्थेत चांगल्या पदावर सहभागी होऊ शकतात. ही भरती  ग्रेड A पदाच्या एकूण 110 रिक्त जागांसाठी केली जाणार आहे. 

किती मिळेल वेतन?

दरमहा 62500 रुपये  ते 126100 रुपये पगार 

शैक्षणिक पात्रता 

या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून लॉ म्हणजेच कायद्यात बॅचलर्स डिग्री/ मास्टर्स डिग्री/ पोस्ट ग्रॅज्युएशन/ पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा/ इंजिनीअरिंगमध्ये बॅचलर्स/ सीए/ चार्टर्ड फायनान्शियल अॅनालिस्ट/ कंपनी सेक्रेटरी/ कॉस्ट अकाउंटन्ट/ आयटी/ रिसर्च/ हिंदी विषयात मास्टर्स/ हिंदी ट्रान्सलेशन इंग्लिश/ संस्कृत/ इंग्रजी/ इकोनॉमिक्स/ कॉमर्स या संबंधित क्षेत्रात पदवी असणं आवश्यक आहे. या भरतीसाठी पदांनुसार वेगवेगळी पात्रता निश्चित करण्यात आली असून याबद्दल सविस्तर माहितीसाठी उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात. 

हे ही वाचा: बहिणीची निर्घृण हत्या, नंतर मृतदेह पोत्यात भरून दिवसाढवळ्या शेतात फेकला अन्... भावाचा भयानक कट

अर्जाचं शुल्क 

अनारक्षित/ ओबीसी/ ईडब्ल्यूएस -1000 रुपये
एससी/ एसटी/ पीडब्ल्यूबीडी - 100 रुपये

हे ही वाचा: "एअरगनने त्याने आधी फायर केलं..." रोहित आर्या केससंबंधी मुंबई पोलिसांची माहिती... स्टुडिओच्या आत नेमकं काय घडलं?

कसा कराल अर्ज? 

1. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम www.sebi.gov.in या सेबीच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. 
2. त्यानंतर, करिअर सेक्शनमध्ये जाऊन Officer Grade A (Assistant Manager)या लिंकवर क्लिक करा. 
3. तिथे Click Here For New Registration वर क्लिक करून नाव, मोबाईल नंबर, ईमेल आयडी यांसारखी आवश्यक माहिती बरून रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड तयार करा. 
4. आता रजिस्ट्रेशन नंबरच्या साहाय्याने लॉगिन करा आणि आपली वैयक्तिक, शैक्षणिक आणि इतर महत्त्वाची माहिती भरा. 
5. नंतर, डॉक्यमेंट्स अपलोड सेक्शनमध्ये फोटो, सही, थंब इम्प्रेशन आणि लेखी डिक्लेरेशन स्कॅन करून अपलोड करा. 
6. शेवटी, अर्जाचं शुल्क भरून फॉर्मची प्रिंटआउट काढून घ्या.

    follow whatsapp