Sangli News : समडोळी (जि. सांगली) : आईच्या निधनाने व्यथित झालेला मुलगा आईच्या अंत्यदर्शनासाठी बंगळूरुहून रवाना झाला होता. मात्र, नियतीला काही वेगळंच मंजूर होतं. आईला शेवटचा निरोप द्यायच्या आधीच मृत्यूने त्या मुलालाच कवटाळले. मिरज तालुक्यातील समडोळी येथे घडलेली ही घटना सर्वत्र हळहळ व्यक्त करणारी ठरली आहे.
ADVERTISEMENT
प्रवासादरम्यान झालेल्या अपघातात सौरभचा जागीच मृत्यू
अधिकची माहिती अशी की, समडोळी येथील मृणालिनी किरण कुदळे (वय 55) यांचे गुरुवारी पहाटे निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी कळताच त्यांचा मुलगा सौरभ (वय 27) हा बंगळूरहून तात्काळ निघाला. आईचे अंत्यदर्शन घेऊन अंत्यसंस्कारात सहभागी होण्यासाठी तो निघाला असतानाच दुर्दैवी घटना घडली. प्रवासादरम्यान झालेल्या अपघातात सौरभचा जागीच मृत्यू झाला.
हेही वाचा : 'मतदार यादीत एकाचा पत्ता सुलभ शौचालयाचा', राज ठाकरेंचं वक्तव्य; आता निवडणूक आयोगाकडून स्पष्टीकरण
आईच्या मृत्यूनंतर मुलाचे असे निधन झाल्याची बातमी समडोळीत पोहोचताच गावात शोककळा पसरली. कुदळे कुटुंब दु:खाच्या डबल आघाताने कोसळले. एकीकडे आईच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू होती, तर दुसरीकडे मुलाच्या मृत्यूची बातमी कानावर पडताच सर्वांचीच पावले थबकली. घरातील वातावरण हंबरडा फोडणारे झाले.
माय-लेकाच्या मृत्यूने संपूर्ण गावावर शोककळा
स्थानिक नागरिकांनी सांगितले की, कुदळे कुटुंब समाजात सुसंस्कृत आणि आदरणीय आहे. मृणालिनीबाई प्रेमळ स्वभावाच्या होत्या, तर सौरभ हा अत्यंत हुशार आणि मेहनती मुलगा होता. आई-मुलाच्या अवघ्या काही तासांच्या अंतराने झालेल्या मृत्यूने परिसरातील सर्वांनाच धक्का बसला आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे समडोळी परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र “हे देवा, इतका क्रूर का झालास?” अशीच प्रतिक्रिया उमटत आहे. अंत्यसंस्कारावेळी संपूर्ण गाव हळहळलेले पाहायला मिळाले. एका दिवसात आई-मुलाला गमावल्याने कुदळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT












