Maharashtra Weather : राज्यातील 'या' विभागाला पावसाचं संकट, हवामानाचा नेमका अंदाज काय?

Maharashtra Weather : भारतीय हवामान विभागाने (IMD) 25 फेब्रुवारी रोजी हवामान विभागाने राज्यात कोरड्या हवामानाचा अंदाज वर्तवला होता. तसेच विदर्भासह इतर काही ठिकाणी हलका पाऊस आणि विजांचा कडकडाट जाणवेल अशी शक्यता वर्तवली. कमाल तापमानात फारसा बदल अपेक्षित नाही, परंतु राज्यात तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. 

Maharashtra Weather

Maharashtra Weather

मुंबई तक

• 05:00 AM • 25 Feb 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

कोकणासह राज्यातील हवामान विभागाचा अंदाज 

point

विदर्भात ढगाळ आकाश राहण्याचा अंदाज

Maharashtra Weather : भारतीय हवामान विभागाने (IMD) 25 फेब्रुवारी रोजी हवामान विभागाने राज्यात कोरड्या हवामानाचा अंदाज वर्तवला होता. तसेच विदर्भासह इतर काही ठिकाणी हलका पाऊस आणि विजांचा कडकडाट जाणवेल अशी शक्यता वर्तवली. कमाल तापमानात फारसा बदल अपेक्षित नाही, परंतु राज्यात तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : डोंबिवलीत डॉक्टरचे नर्सशी विवाहबाह्य प्रेमसंबंध, 10 बिअर आणि 45 झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न

कोकणासह राज्यातील हवामान विभागाचा अंदाज 

कोकण विभागात हवामान कोरडं राहील, पावसाची शक्यता नसेल. मुंबईत मुख्यत्वे आकाश स्वच्छ राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. या विभागात हवामान विभागाने उष्णता वाढेल अशी शक्यता वर्तवली आहे. 

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे हे शहर महत्त्वाचे आहे. या शहरात हवामान विभागाने कोणताही इशारा जारी केला नाही. या विभागात मुख्यत्वे स्वच्छ आकाश आणि दुपारनंतर काही प्रमाणात ढग जाणवतील. 

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरात मुख्यत्वे कोरडं हवामान जाणवेल. या विभागात फारसा बदल होणार नसून, हवामान विभागाने कोणताही इशारा दिला नाही. या ठिकाणी मुख्यत्वे स्वच्छ आकाश राहील. या विभागाला हवामान विभागाने कोणताही इशारा दिला नाही. 

हे ही वाचा : सुप्रिया सुळेंच्या होणाऱ्या व्याहींवर भाजपने टाकली मोठी जबाबदारी, कोणतं पद दिलं?

विदर्भात ढगाळ आकाश राहण्याचा अंदाज

विदर्भातील महत्त्वाचे शहर म्हणून नागपूरकडे पाहिले जाते. या ठिकाणी काही अंशी प्रमाणात वातावरणात बदल जाणवेल असा अंदाज आहे. काही ठिकाणी ढगाळ, तर काही ठिकाणी पावसाची शक्यता जाणवेल. 

    follow whatsapp