वेदर रिपोर्ट : कुठे जोरदार पाऊस, कुठे कडाक्याची थंडी? अलर्ट बघाच!

महाराष्ट्रातील हवामानात सध्या वेगवेगळे बदल पाहायला मिळत आहेत. काही भागांमध्ये सकाळी आणि रात्री थंडीचा अनुभव येत असताना, काही ठिकाणी दिवसा उन्हाचा चटका आणि उकाडा जाणवत आहे.

Maharashtra Weather

Maharashtra Weather

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

देशाच्या वेगवेगळ्या भागांत दोन टोकाच्या हवामान परिस्थिती

point

कसं असेल महाराष्ट्रातील हवामान?

Maharashtra Weather : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पहाटे आणि रात्रीच्या वेळी गारवा जाणवत आहे. मात्र, दुपारच्या वेळी अजूनही उष्णता कायम आहे. विशेषतः मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टीच्या भागात कमाल तापमानात फारशी घट झालेली नाही. त्यामुळे दुपारच्या वेळी नागरिकांना उन्हाचा आणि उकाड्याचा सामना करावा लागत आहे. मात्र, येत्या काही दिवसांत राज्यातील हवामानात बदल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 1 ते 4 डिसेंबरदरम्यान किमान तापमानात आणखी घट होऊ शकते. तसेच कमाल तापमानातही काही प्रमाणात घसरण होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे दुपारच्या वेळी जाणवणारा उकाडा कमी होऊन थंडीचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे.

हे वाचलं का?

वेगवेगळ्या हवामान परिस्थिती

सध्या देशाच्या वेगवेगळ्या भागांत दोन टोकाच्या हवामान परिस्थिती पाहायला मिळत आहेत. उत्तर भारतात वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावामुळे तापमानात घट झाली असून, अनेक भागांत दाट धुक्याची शक्यता आहे. हिमाचल प्रदेशात 27 नोव्हेंबर ते 1 डिसेंबरदरम्यान दाट धुके पडण्याचा अंदाज आहे. पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा या भागांत 28 आणि 29 नोव्हेंबरला धुक्याचा प्रभाव जाणवू शकतो. उत्तर प्रदेशातही रात्री उशिरा आणि पहाटे धुके पडण्याची शक्यता आहे. आसाम आणि मेघालयातही धुक्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर पूर्व राजस्थानमध्ये 28 नोव्हेंबरला थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. येत्या हिवाळ्यात हिमाचल प्रदेशातील काही भागांत बर्फवृष्टी होण्याची शक्यताही हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

हे ही वाचा : मोठी बातमी! NCP शरद पवार गटाकडून भाजप सरकारच्या डिलिमिटेशन विधेयकला पाठिंबा, जितेंद्र आव्हाडांनी केलं जाहीर

'या' ठिकाणी पावसाची शक्यता

दुसरीकडे, दक्षिण भारतात सध्या ईशान्य मोसमी पावसाचा म्हणजेच दुसऱ्या मान्सूनचा प्रभाव पाहायला मिळत आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान नैऋत्य मोसमी पावसात समुद्राकडून जमिनीच्या दिशेने वारे वाहतात. मात्र, ईशान्य मान्सूनमध्ये वाऱ्यांची दिशा उलट असते. त्यामुळे दक्षिण भारतातील काही राज्यांत पावसासाठी पोषक वातावरण तयार होते. तमिळनाडू, पुदुच्चेरी आणि कराईकलमध्ये 28, 29 नोव्हेंबर तसेच 3 डिसेंबरपर्यंत हलक्या पावसाची शक्यता आहे. केरळमध्येही 3 डिसेंबरपर्यंत हलक्या स्वरूपाचा पाऊस सुरू राहू शकतो. अंदमान-निकोबार बेटांवर 30 नोव्हेंबर ते 2 डिसेंबरदरम्यान अनेक भागांत पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तसेच किनारपट्टी आंध्र प्रदेश आणि यानममध्ये 28 नोव्हेंबर ते 3 डिसेंबरदरम्यान काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा : "शरद पवार निरोगी असते तर..", 'ती' टीका अन् राऊतांनी एकाच दगडात मारले अनेक पक्षी!

कसं असेल महाराष्ट्रातील हवामान?

उत्तर भारतातील धुक्यामागे वेस्टर्न डिस्टर्बन्सचा प्रभाव कमी होणे आणि वाऱ्यांचा वेग मंदावणे ही प्रमुख कारणे असल्याचे सांगितले जात आहे. वाऱ्यांचा वेग कमी झाल्यामुळे हवेतील प्रदूषक कण एकाच ठिकाणी साचून राहतात. परिणामी काही भागांत धुक्यासारखी परिस्थिती निर्माण होते, तर काही ठिकाणी थंडीमुळे प्रत्यक्ष धुके पडते. एकीकडे उत्तर भारतात थंडी आणि दाट धुक्याचा प्रभाव वाढत असताना दक्षिण भारतात पावसाचे वातावरण कायम आहे. महाराष्ट्रात मात्र पुढील काही दिवस तापमानात फार मोठा बदल अपेक्षित नाही. 1, 2 आणि 3 डिसेंबरदरम्यान किमान तापमानासोबतच कमाल तापमानातही घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील नागरिकांना लवकरच थंडीचा अधिक अनुभव येण्याची शक्यता आहे.