बारामती : थार चालकाची मुजोरी, वाहतूक पोलिसाला उडवलं; व्हिडीओ व्हायरल

पृथ्वीराज पाटील

26 Nov 2026 (अपडेटेड: 26 Nov 2026, 12:01 PM)

बारामतीमध्ये एका थार चालकाच्या मुजोरीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. थार चालकाने एका वाहतूक पोलिसालाच जोरदार धडक देऊन पळ काढला.

Baramati News

Baramati News

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

बारामतीमध्ये धक्कादायक प्रकार

point

वाहतूक पोलिसाला धडक देऊन चालक फरार

point

व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल

Baramati News, वसंत मोरे : बारामतीमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे एका थार चालकाची मुजोरी समोर आली आहे. रस्त्यावर वाहतुकीचे नियमन करत असलेल्या एका वाहतूक पोलिसाला थार गाडीने जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे. धडक दिल्यानंतर चालकाने घटनास्थळी न थांबता गाडीसह पळ काढला. बारामतीतील सम्यक चौकात घडलेली ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. दरम्यान, चालकाला अटक करण्यात आली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे वाचलं का?

वाहतूक पोलिसाला धडक

मिळालेल्या माहितीनुसार, सम्यक चौकात वाहतूक पोलीस आपले कर्तव्य बजावत होते. यावेळी गाडी बाजूला घेण्यास सांगितले. पण ड्रायव्हर इतका मुजोर होता की त्याने वाहतूक पोलिसाचं ऐकलं तर नाहीच, उलट त्या पोलिसाला धडक देऊन तो पसार झाला.  या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला असून, त्यामध्ये थार गाडी वाहतूक पोलिसाला धडक देऊन पुढे जाताना दिसत आहे. कर्तव्यावर असलेल्या पोलिसालाच अशा प्रकारे धडक देऊन चालकाने पळ काढल्याने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.

हे ही वाचा : गिलच्या मागणीला आयसीसीची नकारघंटा; बॉलवर लाळ लावण्यावरील बंदी कायम राहणार!

व्हिडीओत नेमकं काय?

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यामध्ये थारने वाहतूक पोलिसाला दिलेली धडक स्पष्टपणे दिसत आहे. ही धडक इतकी जोरदार होती की वाहतूक पोलीस अक्षरश: हवेत उडून खाली पडले. या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.

हे ही वाचा : Pune: मंदार किवळेवरील हल्ल्यानंतर रोहित पवारांचा भाजपला सवाल; 'नव्या पुण्याचे शिल्पकार काय बोलणार?'

थार चालक नेमका कोण?

दरम्यान, या थार चालकाचा शोध घेऊन त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी होत होती. वाहतूक पोलिसाला धडक दिल्यानंतर चालक नेमका कुठे फरार झाला? त्याची ओळख पटली आहे का? तसेच या प्रकरणात पोलिसांकडून कोणती कारवाई केली जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र चालकाला अटक करण्यात आली असून विविध कलमांतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.