मोठी बातमी! NCP शरद पवार गटाकडून भाजप सरकारच्या डिलिमिटेशन विधेयकला पाठिंबा, जितेंद्र आव्हाडांनी केलं जाहीर
NCP Sharad Pawar Support Delimitation : "आपापले मतदार बांधायला शिका, किती दिवस असं चालायचं? मी ओपनली सांगतो की साहेब (शरद पवार) हे माझे दैवतच आहेत. त्यांची जी भूमिका असेल ती माझी भूमिका आहे," असं म्हणतच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हा़ड यांनी माध्यमांशी बोलताना माहिती दिलीय.
ADVERTISEMENT

NCP Sharad Pawar Support Delimitation : "आपापले मतदार बांधायला शिका, किती दिवस असं चालायचं? मी ओपनली सांगतो की साहेब (शरद पवार) हे माझे दैवतच आहेत. त्यांची जी भूमिका असेल ती माझी भूमिका आहे," असं म्हणतच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हा़ड यांनी माध्यमांशी बोलताना माहिती दिलीय.
हे ही वाचा : Delimitation वरुन राजकीय वातावरण तापले! संसदेच्या विशेष अधिवेशनाआधी राष्ट्रवादीकडून व्हिप जारी
NCP शरद पवार गटाचे डिलिमिटेशनला समर्थन
पुढे ते म्हणाले की, "भूमिकेच्या बाबतीत कोणाचा प्रश्न येत नाहीय. आठ खासदारांना सोबत घेऊन, सुप्रिया सुळे यांनी निर्णय घेतलाय. आज नाहीतचर उद्या डिलिमिटेशनला पाठिंबा हा द्यावाच लागतो. डिलिमिटेशनला समर्थन देण्याचा निर्णय पक्षाने घेतला असून तो अंतिम असणार आहे", असं आव्हाड म्हणाले.
सुप्रिया सुळे यांना आगामी मुख्यमंत्री करण्यासाठी डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा दिला जात असल्याच्या राजकीय चर्चा सध्या सुरू असल्या, तरी या चर्चांच्या पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड यांनी भूमिका मांडली. डिलिमिटेशन हे संवैधानिक असल्याने ते करावे लागते असे शरद पवार म्हणाले होते असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.
हे ही वाचा : "शरद पवार निरोगी असते तर..", 'ती' टीका अन् राऊतांनी एकाच दगडात मारले अनेक पक्षी!
डिलिमिटेशन काय आहे?
डिलिमिटेशन म्हणजे वाढत्या लोकसंख्येनुसार मतदारसंघांचे नकाशे नव्याने आखणे आणि आमदार-खासदारांच्या जागांची संख्या ठरवणे होय. थोडक्यात, गावागावांची किंवा शहरांची लोकसंख्या जशी बदलते, तशी निवडणुकीच्या मतदारसंघांची रचना आणि सीमा बदलण्याची ही एक घटनात्मक पद्धत आहे.
संजय राऊतांकडून टीका
दुसरीकडे शिवसेना UBT पक्षाचे नेते संजय राऊत यांनी डीलिमिटेशन विधेयकाला देशद्रोही पाऊल म्हटले असून, जो कोणी याला पाठिंबा देईल तो जनतेचा विश्वासघात करेल, असे म्हटले आहे. ते असेही म्हणाले की, 'जे या विधेयकाला पाठिंबा देतील त्यांना देशद्रोही म्हणून पाहिले जाईल.' राऊत म्हणाले की, देशभक्त लोकांनी या विधेयकाला विरोध केला पाहिजे.
ते म्हणाले की, भाजप एका कटाचा भाग म्हणून हे विधेयक आणत आहे. त्यांनी सर्व देशभक्तांना आणि लोकशाहीच्या हितावर विश्वास ठेवणाऱ्यांना या विधेयकाला पाठिंबा न देण्याचे आवाहन केले.
संसदेचे अधिवेशन पुन्हा सुरू होत असताना, सरकार डीलिमिटेशन आणि महिला आरक्षणाशी संबंधित घटनादुरुस्ती आणू शकते, अशी चर्चा आहे. या प्रस्तावामुळे सध्याच्या 543 लोकसभा जागा वाढवून त्यांची कमाल संख्या 850 होईल आणि त्यासाठी डीलिमिटेशन आवश्यक असेल. 2029 च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी लोकसभा आणि राज्य विधानसभांमध्ये महिलांना 33% आरक्षण देण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.
