Govt Jobs : EXIM बँकेत नोकरीची संधी, ट्रेनिंगमध्येच महिन्याला मिळणार 65 हजार पगार

भारत सरकारच्या बँकेत विविध पदांसाठी भरती सुरु झाली आहे. यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 11 डिसेंबर आहे. या पदांसाठी पात्रतेचे निकष काय आहेत, जाणून घ्या.

ADVERTISEMENT

Exim Bank Recruitment
Exim Bank Recruitment
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

एक्झिम बँकेत नोकरीची संधी

point

काय आहेत पात्रतेचे निकष?

point

पगार किती मिळणार?

Exim Bank Recruitment 2026 : बँकेत नोकरी करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. एक्झिम बँक (Export-Import Bank of India) मार्फत 2026 मध्ये मॅनेजमेंट ट्रेनी आणि मॅनेजर या पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे एकूण 120 रिक्त पदे भरली जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 11 डिसेंबर 2026 अशी आहे.

काय आहेत पात्रतेचे निकष?

या भरतीमध्ये मॅनेजमेंट ट्रेनी पदासाठी उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान तीन वर्षांचा पूर्णवेळ पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेला असणे आवश्यक आहे. तसेच फायनान्स, इंटरनॅशनल बिझनेस किंवा फॉरेन ट्रेड विषयातील एमबीए, पीजीडीबीए, पीजीडीबीएम किंवा एमएमएस यापैकी पदव्युत्तर पदवी आवश्यक आहे. याशिवाय सीए किंवा सीएमए उत्तीर्ण उमेदवारही अर्ज करू शकतात. पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमात किमान 60 टक्के गुण किंवा समकक्ष सीजीपीए असणे आवश्यक आहे. मॅनेजर पदासाठी संबंधित पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण, सीए यांसारखी व्यावसायिक पात्रता आणि संबंधित क्षेत्रातील किमान चार वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. या पदासाठीही पदवीमध्ये किमान 60 टक्के गुणांची अट आहे.

हे ही वाचा : कंपनीतील कामावरुन वाद, कामगाराने सुपरवायजरची केली निर्घृण हत्या, तळेगाव MIDC मध्ये काय घडलं?

पगार किती मिळणार?

मॅनेजमेंट ट्रेनी पदावर निवड झालेल्या उमेदवारांना एक वर्षाच्या प्रशिक्षण कालावधीत दरमहा 65 हजार रुपये विद्यावेतन दिले जाणार आहे. प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर त्यांची डेप्युटी मॅनेजर पदावर नियुक्ती केली जाणार असून, वार्षिक सीटीसी सुमारे 25 लाख रुपये असेल. तर मॅनेजर पदासाठी वार्षिक सीटीसी सुमारे 30 लाख रुपये मिळणार आहे. अर्ज शुल्काबाबत बोलायचे झाल्यास सर्वसाधारण आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना 600 रुपये शुल्क भरावे लागेल. तर एससी, एसटी, दिव्यांग, ईडब्ल्यूएस आणि महिला उमेदवारांसाठी 100 रुपये शुल्क आकारले जाणार आहे.

हे ही वाचा : Delimitation वरुन राजकीय वातावरण तापले! संसदेच्या विशेष अधिवेशनाआधी राष्ट्रवादीकडून व्हिप जारी

'असा' करा अर्ज?

या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांनी एक्झिम बँकेच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करावा. अर्ज करण्यापूर्वी भरतीची सविस्तर जाहिरात वाचून शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि इतर अटी तपासून घेणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी www.eximbankindia.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.