सोलापूर जिल्हा बँकेवर भाजपप्रणित पॅनेलची एकहाती सत्ता, मोहिते-पाटलांना धक्का!
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत भाजपप्रणित सहकार विकास पॅनलने बाजी मारली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
सोलापूर जिल्हा बँक निवडणूक
भाजपचे एकहाती वर्चस्व
विजयी उमेदवारांची यादी
Solapur Bank Election : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत भाजपप्रणित सहकार विकास पॅनलने बाजी मारली आहे. बँकेच्या 19 पैकी 18 जागांवर या पॅनलने विजय मिळवला आहे. या निवडणुकीत भाजपप्रणित सहकार विकास पॅनलसमोर मोहिते-पाटील यांच्या स्वाभिमानी शेतकरी सहकार पॅनलचे आव्हान होते. मात्र, माळशिरस मतदारसंघ वगळता इतर जागांवर सहकार विकास पॅनलने विजय मिळवला. त्यामुळे सोलापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपप्रणित पॅनलचे वर्चस्व पाहायला मिळाले.
मोहिते-पाटलांनी गड राखला
या निवडणुकीत मोहिते-पाटील यांनी माळशिरसचा गड राखला आहे. माळशिरस विकास सोसायटी मतदारसंघातून अर्जुनसिंह मोहिते-पाटील विजयी झाले आहेत. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी सहकार पॅनलला एकमेव जागेवर समाधान मानावे लागले. दुसरीकडे, बँक आणि पतसंस्था मतदारसंघातील लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या मतदारसंघातून भाजपप्रणित पॅनलचे मनीष देशमुख आणि शिवसेना शिंदे गटाचे अमोल शिंदे यांच्यात थेट लढत झाली. या अटीतटीच्या लढतीत मनीष देशमुख यांनी अमोल शिंदे यांचा 28 मतांनी पराभव करत विजय मिळवला.
हे ही वाचा : Delimitation वरुन राजकीय वातावरण तापले! संसदेच्या विशेष अधिवेशनाआधी राष्ट्रवादीकडून व्हिप जारी
भाजप प्रणित सहकार विकास पॅनल बिनविरोध उमेदवार :
बिनविरोध उमेदवार :
1) राजेंद्र राऊत : बार्शी वि. सोसा.
2) प्रशांत परिचारक : पंढरपूर वि. सोसा.
3) विक्रांत (बाळराजे) पाटील : मोहोळ वि. सोसा.
4) सिद्धेश्वर आवताडे : मंगळवेढा वि. सोसा.
5) यशराज शिंदे : माढा वि. सोसा.
6) श्रीदीप हसापुरे : दक्षिण सोलापूर वि. सोसा.
7) पृथ्वीराज माने : उत्तर सोलापूर वि. सोसा.
8) शंभूराजे जगताप : करमाळा वि. सोसा.
9) सचिन कल्याणशेट्टी : अक्कलकोट वि. सोसा.
10) अजिंक्यराणा पाटील : ओबीसी
हे ही वाचा : Mumbai NCP Meeting : मुंबईतील एनसीपीच्या बैठकीत काय ठरलं?
भाजप पुरस्कृत पॅनलचे निवडून आलेले सदस्य पुढीलप्रमाणे :
1) बाबासाहेब देशमुख : सांगोला वि. सो.
2) अर्चना घाडगे : महिला
3) शामल बागल : महिला
4) राजेंद्र बंदीछोडे : इतर भटक्या जा.
5) रणजितसिंह शिंदे : कृषी व प्रक्रिया
6) मनीष देशमुख : बँक व पतसंस्था
7) सूर्यादित्य साळुंखे : दुग्ध विकास
8) महादेव कांबळे : अनुसूचित जाती
स्वाभिमानी शेतकरी सहकार पॅनल (मोहिते पाटील) निवडून आलेले सदस्य :
1) अर्जुनसिंह मोहिते पाटील : माळशिरस वि. सोसा.
