Maharashtra Weather : राज्यात सध्या पावसाचा वेग मंदावलेला आढळून येत आहे. काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय, तर काही ठिकाणी मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. अशातच जाणून घेऊयात 7 सप्टेंबर रोजी राज्यातील एकूण हवामान विभागाचा अंदाज पुढीलप्रमाणे..
ADVERTISEMENT
हे ही वाचा : हिंदू आणि मुस्लिमांना सतर्क राहण्याचे राज ठाकरेंचे आवाहन, नेमकं काय म्हणाले?
कोकण
कोकण विभागात पालघर, ठाणे, मुंबई या ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे, तर रायगड येथे मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तविण्यात आलाय.
उत्तर महाराष्ट्र
उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, नाशिक आणि धुळे येथे विजांसह हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. जळगाव आणि अहिल्यानगरमध्ये हलक्या स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तविण्यात आलाय.
पश्चिम महाराष्ट्र
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि कोल्हापूरमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे. सातारा घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा आणि पुणे घाटमाथा परिसरात मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे.
मराठवाडा
मराठवाडा विभागात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आलाय. तसेच काही भागांत ढगाळ वातावरणासह पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा : कराड: दोन वर्षांपासून आईसोबत मित्राचे प्रेमसंबंध, साथीदाराच्या मदतीने बॉयफ्रेंडला संपवलं
विदर्भ
विदर्भात अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने कोणताही अलर्ट वर्तविलेला नाही. तर गडचिरोली या एकाच जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट वर्तविलेला आहे.
ADVERTISEMENT












