Maharashtra Weather : हवामान विभागाचा महत्त्वाचा अलर्ट, पुढील काही तास महत्त्वाचे

Maharashtra Weather : हवामान विभागाने राज्यात कोरडं हवामान राहील असा अंदाज वर्तवला, तसेच उष्णतेची लाट वाढेल अशी देखील शक्यता वर्तवली आहे. पुढील काही तास हे महत्त्वाचे असतील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, राज्यात बहुतेक ठिकाणी उष्ण आणि कोरडे वातावरण राहील.

Maharashtra Weather

Maharashtra Weather

मुंबई तक

• 05:00 AM • 23 Feb 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

हवामान विभागाने राज्यात कोरडं हवामान राहील असा अंदाज वर्तवला

point

जाणून घेऊयात हवामान विभागाचा एकूण अंदाज

Maharashtra Weather : हवामान विभागाने राज्यात कोरडं हवामान राहील असा अंदाज वर्तवला, तसेच उष्णतेची लाट वाढेल अशी देखील शक्यता वर्तवली आहे. पुढील काही तास हे महत्त्वाचे असतील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, राज्यात बहुतेक ठिकाणी उष्ण आणि कोरडे वातावरण राहील, परंतु काही भागांत हलका पाऊस किंवा ढगाळ वातावरण असू शकते. जाणून घेऊया हवामान विभागाचा एकूण अंदाज. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : धाराशिव : चार दिवसांपूर्वी साखरपुडा, मेहंदीचा रंग उतरण्याआधीच नवरदेव अन् नवरी मुलीवर काळाचा घाला

कोकण : 

कोकणात मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर आणि ठाणे जिल्ह्याचा समावेश आहे. यापैकी रत्नागिरीत उष्णता जाणवेल आणि मुंबईत देखील उष्ण हवामान जाणवेल. एकंदरीत हवामान कोरडं राहील असा अंदाज आहे. 

पश्चिम महाराष्ट्र :  


पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर या दोन जिल्ह्यांत तापमान 36 अंश सेल्सिअस राहील असा अंदाज आहे. सोलापूर जिल्ह्यांत हवामान उष्ण आणि कोरडं राहील, तसेच पावसाची शक्यता नगण्य असेल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

मराठवाडा :

मराठवाडा विभागातील परभणीत थंडावा कमी जाणवेल. काही प्रमाणात उष्णता जाणवेल, तसेच काही ठिकाणी ढगाळ वातावरणाचा अंदाज आहे. 

हे ही वाचा : कराडमध्ये बांगलादेशींची घुसखोरी, मुंबईत खोटे कागदपत्र बनवून राहत होते, चौघांना ठोकल्या बेड्या

विदर्भ : 

विदर्भातील ब्रह्मपुरीत उष्ण हवामान विभागाचा अंदाज आहे. दुपारनंतर उष्णतेत आणखी वाढ होईल अशी शक्यता आहे. राज्यातील सर्वाधिक उष्णतेचा भाग विदर्भ आहे. 

    follow whatsapp