Maharashtra Weather : राज्यात सध्या काही भागांत हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवविलेली आहे. तर काही भागांत हवामान कायम राहिलेलं दिसून येतंय. तर काही ठिकाणी पावसाचा यलो अलर्टचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 25 सप्टेंबर 2026 रोजी पृष्ठभागावर जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. ऐनवेळी या हवामानात बदल होण्याची शक्यता आहे. अशातच जाणून घेऊयात एकूण हवामान विभागाचा अंदाज पुढीलप्रमाणे नमूद करण्यात आलाय.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : "इंदिरा गांधी यांच्याविरोधात पसरली होती लाट, मग मोदी आणि शाहा.. ", राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
कोकण
कोकणात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, मुंबई आणि पालघर या जिल्ह्यांत हलक्या पावसाचा अंदाज वर्तविलेला आहे.
उत्तर महाराष्ट्र
उत्तर महाराष्ट्रात धुळे, नंदुरबार, नाशिक, नाशिक घाटमाथा आणि अहिल्यानगर येथे हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तर जळगाव जिल्ह्यात जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे, याचा यलो अलर्ट जारी केला.
पश्चिम महाराष्ट्र
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, पुणे घाटमाथा आणि सातारा जिल्ह्यांत हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर घाटमाथा, कोल्हापूर आणि सांगलीत विजांसह हलक्या पावसाची शक्यता आहे. सोलापूरमध्ये जोरदार वारे वाहण्याचा यलो अलर्ट आहे. सातारा घाटमाथा परिसरात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तविलेला आहे.
मराठवाडा
मराठवाडा विभागात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड जिल्ह्यांत जोरदार वारे वाहण्याची शक्यता असून यलो अलर्ट आहे. हिंगोली, नांदेड येथे पावसाचा यलो अलर्टचा अंदाज वर्तविला आहे. लातूर आणि धाराशिव येथे वेगाने वारे वाहणार असून यलो अलर्ट वर्तविला आहे.
हे ही वाचा : ज्ञानेश कुमार यांनी मोदींच्या घरात चपरासी म्हणून राहावं - अभिजीत दीपके
विदर्भ
विदर्भात अकोला, अमरावती, बुलढाणा, गडचिरोली, नागपूर, वर्धा आणि वाशिम जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट आहे. तर गोंदिया, चंद्रपूर, भंडारा येथे पावसाचा ऑरेंज अलर्टचा अंदाज आहे.
ADVERTISEMENT












