Maharashtra Weather : राज्यात ढगाळ वातावरणासह काही भागांमध्ये हलक्या पावसाने काही प्रमाणात हजेरी लावली होती. विशेष म्हणजे विदर्भात थंडाचा अधिक प्रभाव असणार आहे, असून काही ठिकाणी किमान तापमान हे 7 अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. अशातच एकूण राज्यातील 8 जानेवारी 2025 रोजी हवामानाचा एकूण अंदाजाबाबतची माहिती जाणून घेणार आहोत.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : रवींद्र चव्हाण यांच्या वक्तव्यावरून रान पेटलं, काँग्रेस नेत्यासह आंदोलकांचा संताप, म्हणाले 'तुझा बाप जरी आला तरी...'
कोकण :
कोकण विभागात ढगाळ वातावरणाची शक्यता आहे. तसेच मुंबईत कमाल तापमान हे सुमारे 31 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान हे 20 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. तसेच याच विभागात सकाळी वेळेथ धुक्याची स्थिती जाणवण्याची शक्यता आहे. तर दिवसभरात अंशत: ढगाळ वातावरण राहील असा हवामान विभागाचा अलर्ट आहे.
पश्चिम महाराष्ट्र :
पश्चिम महाराष्ट्रात थंडीचा जोर इतरांच्या तुलनेने कमी असला तरीही पहाटे गारठा जाणवणार आहे. तसेच पुणे शहरात कमाल तापमान हे 29 अंश सेल्सिअस असून किमान तापमान हे 12 अंश सेल्सिअस इतकं राहण्याची शक्यता आहे. पहाटे धुक्यामुळे दृश्यमानका कमी होण्याची शक्यता आहे. परिसरातील इतर जिल्ह्यांमध्ये हवामानाची अशीच स्थिती जाणवेल.
मराठवाडा :
मराठवाडा विभागात सकाळी धुक्याची चादर पसरणार आहे. नंतर आकाश शुभ्र राहण्याची शक्यता आहे. याच विभागातील छत्रपती संभाजीनगरात कमाल तापमान हे 30 अंश सेल्सिअस, किमान तापमान 13 अंश सेल्सिअस इतकं राहील. तसेच किमान तापमानात फारशी घसरण नसल्याने थंडीचा प्रभाव हा अमर्यादीत राहिल असा अंदाज आहे.
हे ही वाचा : काँग्रेस-भाजप महिला कार्यकर्त्या भिडल्या, पोलिसांनी विवस्त्र करून मारहाण केल्याचा भाजप महिला कार्यकर्त्याचा आरोप
विदर्भ :
विदर्भात थंडीचा प्रभाव अधिक असून नागपूर शहरातील कमाल तापमान हे 29 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान हे 9 अंश सेल्सिअस इतकं राहण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. गोंदिया, नागपूर, वर्धा, आणि अमरावतीसह काही भागांमध्ये किमान तापमान हे 10 अंशाच्या खाली गेल्याने गारठा वाढण्याची शक्यता अधिक आहे.
ADVERTISEMENT











