Ashok Kharat Networth : नाशिकमधील राजकीय नेते आणि बड्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना अंकशास्त्राच्या आधारे भविष्य सांगणाऱ्या अशोक खरात उर्फ कॅप्टन खरात याला पोलिसांनी बुधवारी (दि.18) अटक केली आहे. एका पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, खरातने तिला दिव्य शक्तींचे खोटे आमिष दाखवून आणि धार्मिक विधींच्या नावाखाली आपल्या जाळ्यात ओढले. पीडितेला अमली पदार्थ मिश्रित अन्न देऊन आणि हिप्नोटाईज करून तिच्यावर अत्याचार करण्यात आले. हा प्रकार 2022 पासून डिसेंबर 2025 पर्यंत सातत्याने सुरू होता. आरोपीने पीडितेच्या पतीच्या जिवाचे भीती घालून तिला धमकावले होते, मात्र अखेर या प्रकरणात नाशिकमध्ये गुन्हा दाखल झाला असून न्यायालयाने आरोपीला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
ADVERTISEMENT
भविष्याच्या नावाखाली 200 कोटींची माया
कॅप्टन खरातने गेल्या पाच वर्षांत अफाट संपत्ती जमा केल्याचे तपासात समोर येत आहे. अंकशास्त्र आणि भविष्याच्या नावाखाली त्याने केवळ राजकीय नेतेच नव्हे तर खाकी वर्दीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही आपल्या प्रभावाखाली आणले होते. या प्रभावाचा वापर करून त्याने जवळपास 200 कोटी रुपयांची मालमत्ता जमवल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. नाशिकमधील पाथर्डी परिसरात त्याची सुमारे 150 कोटी रुपये बाजारमूल्य असलेली 30 एकर जमीन असल्याचे कागदपत्रांवरून स्पष्ट होत आहे. याशिवाय सिन्नर तालुक्यातील कहांडळवाडी आणि मीरगाव येथेही त्याची मोठी गुंतवणूक असून तिथे एक भव्य फार्महाऊस उभारण्यात आले आहे.
5 वर्षात बनला कोट्यधीश भोंदुबाबा खरात बनला 200 कोटींचा मालक
कॅप्टन अशोककुमारने अंकशास्त्राच्या आधारे राजकीय नेतेमंडळींचे नव्हे तर प्रशासनातील बडे अधिकारी, खाकी वर्दीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे भविष्य सांगत, त्यांना सोबत घेत 200 कोटींची माया जमवली असल्याच्या अंदाज यंत्रणा वर्तवता आहे,
खरातची स्थावर मालमत्ता -
- अंदाजे किंमत 150 कोटी रुपये बाजारमूल्य असलेली नाशिकमधील पाथर्डीत येथे सर्वे नं. 132, 138, 203, 220, 33, 93, 97 मध्ये 30 एकर जमीन.
- 2 कोटींवर किंमत असलेली सिन्नर तालुक्यातील कहांडळवाडी मीरगाव येथे 45 एकर जमीन.
- 30 कोटींहून अधिक बाजारभाव असलेले खरेदीखत, पत्नी कल्पना, मुलगी सृष्टी आणि तृप्तबालाच्या नावे पाथर्डी, गौळाणे शिवारात सर्व्हे नं. 47 स्वतंत्र जमिनीचे खरेदीखत.
- 10 कोटींवर किंमत - सिन्नर तालुक्यातील मीरगाव येथे मंदिराच्या मागे भव्य फार्महाऊस.
- अंदाजे 2 कोटी रुपये: इशान्येश्वर मंदिर ट्रस्टची वर्षाला उलाढाल.
- 5 कोटी : ओझर विमानतळाजवळ, जानोरी, दहावा मैल भागात जमिनी.
- 5 कोटी: कर्मयोगीनगरचा बंगला, तर कॅनडा कॉर्नरचे ऑफिस 1 कोटी
या व्यतिरिक्त शिर्डी येथे अतिशय मोक्याच्या ठिकाणी शेतजमीन आहे, हैस जमिनीची किंमतही करोडोत आहे.
शिर्डी ते ओझरपर्यंत जमिनींचे जाळे
खरातची मालमत्ता केवळ एका शहरापुरती मर्यादित नसून तिचे जाळे राज्यभर पसरलेले दिसते. पाथर्डी आणि गौळाणे शिवारात त्याने आपल्या पत्नी आणि मुलींच्या नावे कोट्यवधींचे खरेदीखत केले आहे. ओझर विमानतळाजवळील जानोरी आणि दहावा मैल भागातही त्याची पाच कोटींहून अधिक किमतीची जमीन आहे. इतकेच नव्हे तर शिर्डी सारख्या महत्त्वाच्या ठिकाणी मोक्याच्या जागेवर त्याने शेतजमीन खरेदी केली असून तिची किंमतही करोडोच्या घरात आहे. नाशिकमधील कर्मयोगीनगर येथील बंगला आणि कॅनडा कॉर्नर येथेही आलिशान ऑफिस असल्याचे समोर आले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











