Maharashtra Weather : राज्यात सध्या मान्सून गायब झाल्याचं चित्र आहे. बहुतांश ठिकाणी कोरड्या हवामानाची शक्यता वर्तविली आहे, तर काही भागांत उन्हाचा चटका कायम राहणार असल्याची शक्यता आहे. अशातच जाणून घ्या 5 ऑक्टोबर 2026 रोजी राज्यातील एकूण हवामानाचा अंदाज पुढीलप्रमाणे नमूद करण्यात आलाय.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : शेजारच्या व्यक्तीकडून 3 वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार, तक्रार मागे घेण्यास आणला दबाव
कोकण
कोकणात पालघर, मुंबई, ठाणे, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांत काही ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांत उष्ण आणि दमट हवामानाचा यलो अलर्टचा अंदाज आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरड्या हवानामाची शक्यता आहे.
उत्तर महाराष्ट्र
पश्चिम महाराष्ट्रात धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नाशिक घाटमाथा आणि अहिल्यानगर येथे कोरड्या हवामानाची शक्यता वर्तविली आहे.
पश्चिम महाराष्ट्र
पश्चिम महाराष्ट्रात पुणे, पुणे घाटमाथा, कोल्हापूर, कोल्हापूर घाटमाथा, सातारा, सातारा घाटमाथा परिसर, सांगली आणि सोलापूर येथे कोरड्या हवामानाची शक्यता आहे.
मराठवाडा
मराठवाडा विभागात छत्रपती संभाजीनगर, परभणी, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड आणि लातूर जिल्ह्यांत हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा : राज ठाकरेंनी भरसभेत भाजपच्या मतांची काढली आकडेवारी, सहा महिन्यात 'एवढी' मते
विदर्भ
विदर्भात अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांत हवामान विभागाने कोणताही अलर्ट वर्तविलेला नाही.
ADVERTISEMENT












