Maharashtra Weather : राज्यात मान्सूनपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे, अशातच राज्यातील काही ठिकाणी उष्णतेचा यलो अलर्टचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच कोकणातील सर्वच जिल्ह्यांत हवामान विभागाने पावसाचा यलो अलर्ट वर्तवलेला आहे, अशातच जाणून घेऊयात 15 जून 2026 रोजी राज्यातील एकूण हवामानाचा अंदाज पुढीलप्रमाणे जाणून घेऊयात.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : घराला रंगकाम करण्यासाठी आले, महिलेला एकटं पाहून नको तेच अन्..
कोकण
कोकण विभागातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांत हवामान उष्ण राहणार आहे. तसेच दुपारनंतर हलक्या पावसाचा अंदाज आहे. याच विभागाला यलो अलर्टचा अंदाज आहे. सिंधुदुर्ग या जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता आहे.
उत्तर महाराष्ट्र
धुळे या जिल्ह्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे. तसेच नंदूरबार, जळगाव या दोन जिल्ह्यांत काही ठिकाणी उष्ण व दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. तसेच नाशिक, अहिल्यानगर या जिल्ह्यांत हलका पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवलेली आहे.
पश्चिम महाराष्ट्र
पुणे जिल्ह्यात हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह वादळ; तसेच काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता वर्तवली आहे. याच जिल्ह्यांना पावसाचा यलो अंदाज वर्तवण्यात आला.
मराठवाडा
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना या जिल्ह्यांत उष्णतेचा यलो अलर्ट वर्तवण्यात आला आहे. परभणी, हिंगोली या दोन जिल्ह्यांना हलक्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. बीड, नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांत हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा इशारा वर्तवण्यात आलेला आहे. तसेच अकोला या जिल्ह्यांत कोणताही अलर्ट वर्तवण्यात आलेला नाही.
हे ही वाचा : नर्सकडून आधी नवऱ्याला घटस्फोट आणि मग मोठं कांड
विदर्भ
विदर्भ विभागातील अमरावतीत उष्णतेची लाट पसरणार आहे. भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली. गोंदिया, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांना काही ठिकाणी विजांचा कडकडाटासह सोसायट्याच्या वाऱ्यासह वादळाची शक्यता आहे. या जिल्ह्यांत उष्णतेची लाट पसरण्याची शक्यता आहे. तसेच वाशिम आणि बुलढाणा या जिल्ह्याला कोणताही अलर्ट वर्तवलेला नाही.
ADVERTISEMENT











