सोलापूर हळहळलं, विहिरीत पिकअप कोसळून 8 भाविकांचा मृत्यू; माळशिरसमधील घटना

मुंबई तक

14 Jun 2026 (अपडेटेड: 14 Jun 2026, 06:46 PM)

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातून भीषण अपघाताची एक बातमी समोर येत आहे. भाविकांना घेऊन जाणारी एक पिकअप गाडी थेट विहिरीत कोसळल्याने तब्बल 8 जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

Solapur Accident

Solapur Accident

Google CTA

बातम्या हायलाइट

point

सोलापूर हळहळलं

point

विहिरीत पिकअप कोसळून 8 भाविकांचा मृत्यू

point

माळशिरसमधील घटना

Solapur Accident : सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातून भीषण अपघाताची बातमी समोर येत आहे. म्हसवड-पंढरपूर मार्गावर तांदूळवाडी गावाजवळ एक अत्यंत भीषण आणि काळजाचा थरकाप उडवणारा अपघात घडला. भाविकांना घेऊन जाणारी एक पिकअप गाडी थेट विहिरीत कोसळल्याने तब्बल 8 जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या भीषण अपघातामुळे संपूर्ण परिसरात आणि मृतांच्या गावावर शोककळा पसरली आहे.

हे वाचलं का?

सिद्धनाथाच्या दर्शनाहून परतताना काळाचा घाला

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अपघातातील सर्व प्रवासी हे पंढरपूर तालुक्यातील रांजणी गावचे रहिवासी होते. हे सर्व भाविक सातारा जिल्ह्यातील म्हसवड येथील प्रसिद्ध श्री सिद्धनाथाच्या दर्शनासाठी गेले होते. देवाचे दर्शन घेऊन आनंदाने आपल्या गावाकडे, रांजणीकडे परतत असताना माळशिरस तालुक्यातील तांदूळवाडी गावानजीक त्यांच्या पिकअप गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या एका खोल विहिरीत कोसळली.

हे ही वाचा : 'मातोश्री'वरील बैठकीत किती खासदार गैरहजर? 'यांनी' वाढवलं ठाकरेंचं टेन्शन...

रोहित पवारांनी व्यक्त केले दु:ख

या दुर्दैवी अपघातानंतर रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत दु:ख व्यक्त केले आहे.  यामध्ये त्यांनी म्हटलं की, 'माळशिरसमध्ये (जि. सोलापूर) पिकअप गाडी विहिरीत कोसळून 8 जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त अत्यंत वेदनादायी, दुदैवी आणि मन सुन्न करणारं आहे. यातील मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली! मृतांच्या कुटुंबियांवर कोसळलेल्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. या अपघातामागील कारणाचा शोध घेण्यासोबतच शासकीय यंत्रणेने तातडीने बचाव कार्यात मदत करावी!'

हे ही वाचा : पांढऱ्या पट्टीचा वाद: 'निलेश चंद्रांनी चंद्रावर राहावं, धर्म घरात..' मनसे नेता प्रचंड चिडला!

आमदार उत्तम जानकर काय म्हणाले?

या घटेनिवषयी माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांनी देखील दु:ख व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, 'सदर अपघात माझ्याच तालुक्यात तांदूळवाडी गावाच्या हद्दीत झालेला आहे. रस्त्याच्या कडेलाच विहिर आहे. यामध्ये चार महिला आणि चार मुलं अशी आठ  लोकं मयत झाली आहेत. बाकीच्या दोघांना पंढरपूरला हलवण्यात आलेलं आहे. पंढरपूर तालुक्यातील हे लोक असल्याचं समजतंय. मी पाच मिनिटात तिथं पोहोचतोय. तिथे मदत झालेली आहे मात्र ज्यांना पोहता येत नव्हतं त्यांचा मृत्यू झाला. वाईट गोष्ट म्हणजे यामध्ये लहान मुलं आहेत, महिला आहेत. ही अतिशय दुर्दैवी घटना आहे.'