Mallika Rajput : भय्यू महाराजांवर खळबळजनक आरोप केलेल्या मल्लिका राजपूतचा गुढ मृत्यू

प्रशांत गोमाणे

• 08:29 PM • 14 Feb 2024

Mallika Rajput Suicide,Bhaiyyu Maharaj : मल्लिका राजपूतच्या (Mallika Rajput) या मृत्यूनंतर स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू भय्यू महाराजांचे नाव चर्चेत आले आहे. कारण भय्यू महाराज( Bhaiyyu Maharaj) यांच्या आत्महत्येपूर्वी त्यांच्यावर एका अभिनेत्रीने गंभीर आरोप केले होते. हे आरोप करणारी अभिनेत्री ही मल्लिका राजपूत होती.

मल्लिका राजपूतच्या (Mallika Rajput) या मृत्यूनंतर स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू भय्यू महाराजांचे नाव चर्चेत आले आहे. कारण भय्यू महाराज( Bhaiyyu Maharaj) यांच्या आत्महत्येपूर्वी त्यांच्यावर एका अभिनेत्रीने गंभीर आरोप केले होते.

mallika rajput suicide case bhaiyyu maharaj controversy big allegation

follow google news

Mallika Rajput Suicide,Bhaiyyu Maharaj : प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री मल्लिका राजपूतच्या मृत्यूने एकच खळबळ उडाली आहे.  मंगळवारी 13 फेब्रुवारीला घरात संशयास्पद अवस्थेत मल्लिकाचा मृतदेह आढळला होता. मल्लिका राजपूतच्या (Mallika Rajput) या मृत्यूनंतर स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू भय्यू महाराजांचे नाव चर्चेत आले आहे. कारण भय्यू महाराज( Bhaiyyu Maharaj) यांच्या आत्महत्येपूर्वी त्यांच्यावर एका अभिनेत्रीने गंभीर आरोप केले होते. हे आरोप करणारी अभिनेत्री ही मल्लिका राजपूत होती. त्यामुळे नेमके मल्लिकाने भय्यू महाराजांवर काय आरोप केले होते. आणि संपूर्ण प्रकरण काय आहे? हे जाणून घेऊयात.  (mallika rajput suicide case bhaiyyu maharaj controversy big allegation)  

हे वाचलं का?

नेमका आरोप काय? 

अभिनेत्री मल्लिका राजपूतने त्यावेळी भय्यू महाराजांवर फसवणूकीचा आरोप केला होता. भय्यू महाराज वेगवेगळ्या नंबरवरून फोन करून तिला त्रास द्यायचे, असाही दावा मल्लिका राजपूतने केला होता. भय्यू महाराजांवर आरोप केल्यानंतर मल्लिका राजपूत प्रचंड चर्चेत आली होती. 

हे ही वाचा : Rajya Sabha 2024 : अजित पवारांचा चक्रावून टाकणारा निर्णय!
 
'भय्यू महाराज हे तांत्रिक आहेत. मी खूप मेहनत करून त्यांच्यावर पुस्तक लिहिले आहे. त्याच्याकडे अडीच वर्षांपासून पुस्तकाच्या 950 प्रती आहेत. त्यांनी मला गोंधळात टाकले आणि आता मला वेगवेगळ्या नंबरवरून कॉल करतात', असा आरोप मल्लिका राजपूतने त्यावेळेस भय्यू महाराजांवर केला होता. 

माझे पुस्तक परत न केल्याबद्दल मी त्यांना न्यायालयीन नोटीस पाठवीन. त्याचे पत्रही माझ्याकडे आहे. तो खोट्याचा बाहुला आहे बाकी काही नाही,असेही मल्लिका राजपूतने म्हटले आहे. मल्लिकाने गंभीर आरोप केल्यानंतर 12 जून 2018 रोजी भय्यूजी महाराज यांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली होती.

नेमकं प्रकरण काय? 

गायिका विजय लक्ष्मी उर्फ ​​मल्लिका राजपूत (Vijay Lakshmi) हिचा सुलतानपूरमधील (Sultanpur) राहत्या घरी संशयास्पद मृत्यूदेह आढळून आला आहे. या प्रकरणाची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, 13 फेब्रुवारी रोजी मल्लिका राजपूतचा मृतदेह तिच्या घरामध्ये पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला होता. या घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.

हे ही वाचा : पार्थ पवारांसाठी अजित पवारांची काय असणार रणनीति

मल्लिका राजपूतची आई सुमित्रा सिंह यांनी सांगितले की, तिच्या खोलीचा दरवाजा बंद होता, त्यामुळे आम्ही आधी लक्ष दिले नाही. मात्र त्यानंतर तीन वेळा दरवाजा ठोठवला होता. मात्र तिने दरवाजा उघडला नाही. मात्र त्यानंतर घरातील लोकांनी तिच्या घराचा दरवाजा पुन्हा ठोठवला आणि ती उघडत नसल्याचे पाहून धक्का देऊन तो उघडण्यात आला. त्यावेळी आम्हाला समोर तिचा लटकलेल्या अवस्थेत मृतदेह दिसून आल्याचे तिच्या आईने सांगितले. 

    follow whatsapp