कोण आहेत पार्थ पवार? त्यांच्यासाठी अजित पवारांचे पुढचं पाऊल असेल?
राज्यसभेच्या उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता पुन्हा एकदा पार्थ पवारांच्या नावाची चर्चा होऊ लागली आहे. मात्र अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजून कोणताही उमेदवारी जाहीर केली नसली तरी पार्थ पवारांसाठी अजित पवार काय निर्णय घेणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

पार्थ पवारांसाठी दादांची रणनीति ठरली

पार्थ पवार नेमकं कोण आहेत

पार्थ पवारांसाठी दादांचं पुढचं पाऊल काय?
Ajit Pawar: राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष असलेल्या शरद पवार यांच्या विरोधात बंड करून अजित पवार यांनी शिंदे सरकार आणि भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये जात उपमुख्यमंत्री पदी विराजमान झाले. त्यानंतर राज्यातील राजकारण अनेकार्थाने ढवळून निघाले. अजित पवारांच्या या निर्णयामुळे पवार कुटुंबीयांमध्ये सत्तासंघर्षाला सुरुवात झाली.
शिरूर लोकसभा
पवार विरुद्ध पवार हा संघर्ष सुरु झाल्यापासूनच अजित पवार यांच्या सुपुत्राचीही जोरदार चर्चा सुरू झाली आहे. ही चर्चा होण्यापाठीमागे शिरूर लोकसभा मतदारसंघातून अजित पवार आपला मुलगा पार्थ यांची उमेदवारी घोषितही करू शकतात अशीही चर्चा आहे.
मावळ मतदारसंघातून पराभव
याआधी 2019 च्या लोकसभा निवडणुकीतही ते पहिल्यांदाच राजकारणात आपले नशीब आजमावत होते, मात्र त्यावेळी त्यांना त्यामध्ये यश आले नव्हते. पार्थ पवारांना मावळ मतदारसंघातून पराभवाचा सामना करावा लागला होता.
सरकारच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह
पार्थ पवार यांनी महाविकास आघाडीच सरकार असताना तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांना लिहिलेल्या पत्रामुळे चर्चेत आले होते. त्यामध्ये त्यांनी अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूबाबत महाविकास आघाडी सरकारच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यानंतर त्या सुशांत सिंहच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली होती.