6 वर्ष अफेअरनंतर लग्न.. पहिल्याच दिवशी पतीने सोडून दिलं, 'हे' गुपित आलं समोर अन्..

Marriage Life : एका ऑस्ट्रेलियन महिलेने रेडिओ शोच्या दरम्यान तिने आपल्या आयुष्याची कथाच सांगितली. 6 वर्षे तरुणासोबत नातेसंबंधात राहूनही विवाहानंतर तिचा होणारा पती भर मंडपातून पळून गेला. याचं कारणही आश्चर्यचकीत करणारं आहे. 

लग्नाच्या पहिल्याच दिवशी पतीने दिलं सोडून (प्रातिनिधिक फोटो)

लग्नाच्या पहिल्याच दिवशी पतीने दिलं सोडून (प्रातिनिधिक फोटो)

मुंबई तक

30 May 2025 (अपडेटेड: 30 May 2025, 01:06 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

सहा वर्षे डेट करणारा पती गेला पळून

point

हनीमून दिवशी पत्नी होती एकटीच

point

एफएम रेडिओच्या माध्यमातून तरुणीने सांगितली मनातील सल

Marriage Life: एका ऑस्ट्रेलियन महिलेने रेडिओ शोच्या दरम्यान आपल्या आयुष्याची कथा सांगितली. 6 वर्षे तरुणासोबत नातेसंबंधात राहूनही विवाहानंतर तिचा होणारा पती भर मंडपातून पळून गेला. याचं कारणही आश्चर्यचकीत करणारं आहे. आता हेच कारण तरुणीने सांगितलं आहे. 

हे वाचलं का?

नेमकं काय घडलं? 

ऑस्ट्रेलियन महिलेनं खुलासा केला की, ती एका तरुणासोबत गेली 6 वर्षे रिलेशनशीपमध्ये होती. मात्र, तिच्या होणाऱ्या पतीने कशाचाही विलंब न करता त्या नात्यावर पाणी सोडलं आणि तो तिला सोडून निघून गेला. संबंधित महिलेचं नाव हे काइली असे आहे. तिनं सांगितलं की, तिनं अशा परिस्थितीला तोंड दिल्याने ती हैरान झाली.

हेही वाचा : गुरूचा 'या' राशीत प्रवेश, पाहा कसं असेल तुमचं राशीभविष्य!

कइलीने सांगितलं की, आमच्या विवाहाचे अगदी साध्या पद्धतीत आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी आमच्या आठवणी साठवून ठेवण्यासाठी अनेक फोटोशूट केले होते. अशावेळी तो खूपच सुंदर दिसत होता. तो माझ्या आयुष्यातील एक प्रकारे निखळ प्रेमाचा झराच होता. मात्र, आमच्या नात्याला कोणाची नजर लागली? आमचं नातं काही क्षणार्धात निसटून गेलं आहे. 

कइली गेली सहा वर्षे तरुणाला डेट करत होती. लग्नाचा दिवस आला आणि तो तरुण नेमका विवाहाच्या दुसऱ्याच दिवशी गायब झाला. हे सर्व पाहून कइलीला आश्चर्याचा धक्का बसला. अनेक प्रश्नांमुळे तिच्या डोक्यात काहुर माजू लागलं होतं. पत्नी म्हणाली तो इतके वर्षे मला ओळखतो, तो असं करेल मला वाटलं नव्हतं. 

हनीमुन दिवशी प्रियेसी एकटीच

विवाहानंतर हनीमुनबाबत तिच्या कुटुंबियांनी तिला अनेकदा विचारले असता. तिनं ही घटना आपल्या कुटुंबियांना सांगितली नाही. एवढे वर्षे प्रियकर माझ्यासोबत राहिला आणि आज तो माझ्यासोबत नाही, हनीमुनसारख्या क्षणाला कइली मुकली होती.   

दरम्यान, तरुण हा गेल्या काही वर्षांपासून इतर मुलींना डेट करत होता. मला याची किंचीतशीही माहिती मिळाली नाही. त्याला माझ्यासोबत विवाह करायचा नव्हता. एवढंच नायतर तिच्या प्रियकराचे कइकीच्या चुलत बहिणीसोबत प्रेमसंबंध होते. हे तिला जेव्हा कळाले तेव्हा तिला खूप वाईट वाटलं. 

हेही वाचा : Honey Trap: तरुणीच्या जाळ्यात अडकला अन्.. ठाणे शहरातून पाकिस्तानला गोपनीय माहिती देणारा तो तरूण कोण?

दरम्यान, तिने मागील घडलेल्या घटनेच्या वैवाहिक जीवनाचा वाईट अनुभव अनुभवला आहे. तिने विवाहानंतर आपल्या नात्याला ब्रेक लावत घटस्फोट घेतला. यानंतर तिला वाचरण्यात आले की, तु पुन्हा एकदा विवाह करु शकतेस का? त्यावर तिने नकार दिला. 


 

    follow whatsapp