विवाहित महिलेचा 'दृष्यम 2' प्लॅन फसला! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी थेट मृतदेहच..त्या रात्री काय घडलं?

Married Woman Love Story Viral : गुजरातमध्ये एका धक्कादायक घटनेमुळं एकच खळबळ उडाली आहे. येथील एका विवाहित महिलेनं तिच्या प्रियकरासोबत पळून जाण्यासाठी 'दृष्यम 2' चित्रपटाच्या स्टाईलने प्लॅन बनवला.

Married Woman Viral News

Married Woman Viral News

मुंबई तक

• 04:58 PM • 29 May 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

प्रियकरासोबत पळून जाण्यासाठी महिलेनं केला खतरनाक प्लॅन

point

पण कुटुंबियांना मृतदेह सापडल्यावर घडलं...

point

पोलिसांनी आरोपींना कसं शोधलं?

Married Woman Love Story Viral : गुजरातमध्ये एका धक्कादायक घटनेमुळं एकच खळबळ उडाली आहे. येथील एका विवाहित महिलेनं तिच्या प्रियकरासोबत पळून जाण्यासाठी 'दृष्यम 2' चित्रपटाच्या स्टाईलने प्लॅन बनवला. मृत्यूचा खोटं नाटक करून खतरनाक प्लॅन करणाऱ्या महिलेनं आणि तिच्या प्रियकरानं भयंकर कृत्य केलं. या दोघांनी मिळून एका व्यक्तीची हत्या केली.

हे वाचलं का?

त्यानंतर पोलिसांना चकवा देण्यासाठी मृतदेहावर स्वत:चे कपडे घातले आणि मृतदेह जाळून टाकला. पण त्यानंतर कुटुंबियांना अर्धवट जळालेला मृतदेह सापडला. मृतदेहावर महिलेचे कपडे पाहिल्यानंतर कुटुंबियांना वाटलं की, हा मृतदेह महिलेचा आहे. परंतु, मृतदेह पुरुषाचा असल्याचं नंतर उघडकीस आलं. त्यानंतर या गंभीर घटनेचा पर्दाफाश झाला. 

हे ही वाचा >> शिंदेंच्या पठ्ठ्यानं स्वत:च्याच गाडीवर करवून घेतला गोळीबार, युवासेनेच्या जिल्हा प्रमुखाचा डाव काय होता?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही धक्कादायक घटना पाटनच्या संतालपूर तालुक्यातील जाखोत्रा गावात घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी महिला गीता अहीर आणि तिचा 12 वर्षांचा प्रियकर भरत अहीरला पालनपूर रेल्वे स्टेशनवर अटक केलं.पाटनचे एसपी वी.के नवी यांनी दिलेली माहिती अशी की, गीता तिच्या पतीसोबत जाखोत्रा गावात राहत होती.

पण ती त्याच्यासोबत खुश नव्हती. त्यामुळे गीताने भरतसोबत विवाहबाह्य संबंध सुरु केले. त्यानंतर गीताने भरतसोबत पळून जाण्यासाठी स्वत:च्या मृत्यूचा खोटं नाटक रचलं. गीताने प्रियकराला एक मृतदेह शोधण्यासाठी सांगितलं. कारण सर्वांना वाटेल की, महिलेचा मृत्यू झाला आहे आणि ते गुजरामधून पळून अन्य राज्यात एकत्रित राहतील.

हे ही वाचा >> Govt Job: जबरदस्त! आता तुम्ही साहेब होणार..SBI मध्ये हजारो पदांसाठी बंपर भरती, फक्त अर्ज करताना..

पोलिसांनी माहिती दिली की, आरोपींनी मृतदेहाला गीताचे कपडे (घागरा) आणि दागिने घातले होते. त्यामुळे मृतदेह पाहून कुटुंबियांना वाटलं की, हा मृतदेह महिलेचा आहे. पण त्यानंतर जेव्हा मृतदेह घरी घेऊन आले, तेव्हा त्यांना कळलं की, हा मृतदेह पुरुषाचा आहे. त्यानंतर त्यांनी या घटनेबाबत पोलिसांना कळवलं. हा मृतदेह हरजीभाई सोलंकी यांचा असल्याचं नंतर स्पष्ट झालं. त्यानंतर पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला आणि आरोपी गीता आणि भरतवर अटकेची कारवाई केली. 

    follow whatsapp