लग्नाच्यावेळी पत्नीच्या पोटात होतं बॉयफ्रेंडचं बाळ, सत्य समजताच पतीचा गेला जीव

Crime news : पत्नीच्या पोटात तिच्या बॉयफ्रेंडच्या बाळ वाढत होतं. ही सत्य परिस्थिती समजताच तरुणाने विवाहाच्या तीन महिन्यानंतर आत्महत्या केली.

Crime news Up jhansi The lover's baby was growing in the wife's belly then husband Suicide

Crime news Up jhansi The lover's baby was growing in the wife's belly then husband Suicide

मुंबई तक

29 May 2025 (अपडेटेड: 29 May 2025, 03:25 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

विवाहानंतर तरुणाने केली आत्महत्या

point

आत्महत्येचं कारण ऐकूण बसेल धक्का

Crime News : उत्तर प्रदेशातील झांसी बबीना ठाणे परिसरातील लहर ठकुरपुरा गावातील रहिवासी बृजेंद्र रायकर या तरुणाचा नुकताच विवाह झाला होता. तरुणाची पत्नी ही ललितपुर येथील रहिवासी होती. मात्र तीन महिन्यानंतर पतीने आत्महत्या केल्याची दुर्देवी घटना आहे. विवाहानंतर तरुणाने आत्महत्या का केली? असा अनेकांना प्रश्न उपस्थित झाला आहे. या आत्महत्येचं कारण आता समोर आलं आहे. 

हे वाचलं का?

हेही वाचा : भाजप आमदाराच्या बंगल्यात घुसून गोंधळ, पोलिसांनाही शिवीगाळ पुण्यात चाललंय तरी काय?

पीडित तरुणाच्या कुटुंबियांनी सुनवली खरी खोटी

बृजेंद्रच्या कुटुंबाने दावा केला की, तिच्या माहेरी एका तरुणासोबत तिचं अफेयर होतं आणि विवाहादरम्यान ती गर्भवती होती. तिच्या पोटात दुसऱ्याचंच बाळ वाढत होतं. त्यामुळे तरुण या विवाहानंतर आनंदी नव्हता. पीडित कुटुंबाचं म्हणणं होतं की, त्यांना याबाबत कोणतीही माहिती नव्हती. या मुद्द्यावरुन घरात दररोज वाद होत होता. यानंतर खरं कारण समोर आलं आहे. पीडित तरुणाला याच मुद्द्यावरुन पत्नीची आई आणि पत्नी सतत धमकी देत होती. या वादाला कंटाळून पीडित तरुणाने आत्महत्या केली. 

बृजेंद्रची आई गुलाब देवी यांनी आरोप केला की, लग्नानंतर आमचा मुलगा आनंदी होता. पण आमच्या सुनेच्या चेहऱ्यावर नेमही बारा वाजलेले असायचे. ती फक्त भांडण करत होती. पत्नीचं माहेरी एका तरुणासोबत अफेयर होतं. तिच्या पोटात त्याचंच मुल वाढत होतं. विरोध केल्यानंतर तिने पीडित तरुणाला अनेकदा धमकी दिली. 

पीडित तरुणाच्या आईनं सांगितलं की, त्यांनी एवढं होऊनही हे सर्व स्वीकारलं होतं. मात्र, एवढं होऊनही पत्नी आणि पीडित मृत तरुणाच्या सासूने अनेकदा धमकी दिली. 

हेही वाचा : पाकिस्तानात गेलेल्या नागपूरच्या 'त्या' महिलेला अटक, पोलिसांनी मध्यरात्री... प्रकरण काय?

मृत्य पीडिताच्या आईनं सांगितलं की, तिचा मुलगा हा सासरी गेला. त्यावेळी सुनेनं आणि तिच्या आईने तरुणाच्या कुटुंबियांसोबत वाद घातला. त्यानंतर तरुण घरी आला आणि त्यांना समजावण्यात आलं. दरम्यान, पोलिसांनी मृत व्यक्तीचा मृतदेह एका रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आलं. 

    follow whatsapp