भाजप आमदाराच्या बंगल्यात घुसून गोंधळ, पोलिसांनाही शिवीगाळ पुण्यात चाललंय तरी काय?
Pune Crime : पुण्यातील खडकवासलाचे भाजप आमदार भीमराव तापकिर यांच्या बंगल्यात घुसून गोंधळ करणाऱ्याला अटक केली. नेमकं प्रकरण काय होतं हे जाणून घ्या.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

पुणे हे गुन्हेगारीचं हॉटस्पॉट ठरलं आहे.

काही लोकांनी पुण्यातील खडकवासल्याचे भाजपच्या आमदाराच्या घरात घुसण्याचा प्रयत्न
Pune Crime News : पुणे हे गुन्हेगारीचं हॉटस्पॉट ठरलं आहे. अशातच पुण्यातील काही लोकांनी खडकवासल्याचे आमदार भीमराव तापकीर यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला. घुसखोरी करणाऱ्यांनी पोलिसांना शिवीगाळ करत मारण्याची धमकी दिली आहे. याच प्रकरणात आता एकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ज्या आमदारांच्या बंगल्यात घुसण्याचा प्रयत्न करण्यात आला तो आमदार भाजपचा आहे. या प्रकरणात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
हेही वाचा : पाकिस्तानात गेलेल्या नागपूरच्या 'त्या' महिलेला अटक, पोलिसांनी मध्यरात्री... प्रकरण काय?
दरम्यान, अटक करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे नाव हे शंकर धुमाळ असून त्यांचे वय 47 वर्षे आहे. शंकर धुमाळ यांनी खडकवासल्याचे आमदार भीमराव तापकीर यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याच्यासह इतर काहीं जणांनी पोलिसांना शिवीगाळ करत मारहाण करण्याची धमकी दिली. यानंतर आता आमदाराच्या सुरक्षेसाठी नेमण्यात आलेल्या सुरक्षा कर्मचारी अजित देवघरे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
नेमकं प्रकरण काय?
आरोपी शंकर धुमाळ वारंवार आमदार भीमराव तापकीर यांच्या घराच्याबाहेर जाऊन गोंधळ घालायचा. त्याने तीन वेळा आमदारांच्या घरात घुसण्याचा प्रयत्नही केला. त्याला अनेकदा रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. आमदाराच्या सुरक्षारक्षकांसाठी असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ केली. त्यानंतर मारहाण केल्याची धमकीही देण्यात आली.
या घटनेनंतर आमदारांच्या सुरक्षारक्षकाने सहकारनगर पोलीस ठाण्यामध्ये घटनेविरोधात तक्रार नोंदवली आहे. सुरूवातीला आरोपीवर किरकोळ स्वरूपाची कारवाई केली आहे. मात्र, यानंतर त्याने अनेकदा आमदारांच्या घरी घुसण्याचा प्रयत्न केला. अनेकदा पोलिसांना शिवीगाळ केली. त्यांच्या या कृत्याविरोधात आमदारांनी थेट पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना पत्र पाठवत लक्ष घालण्याची मागणी केली आहे. यावरुनच त्यांनाही अटक करण्यात आली आहे.
हेही वाचा : कोयत्याचे 17 वार, सूर्यकांतने तडफडत जीव सोडला, बाप-लेकानं कुणाचंच ऐकलं नाही, वाद नेमका काय?
या प्रकारामुळे आमदार आणि त्यांच्या कुटुंबाच्या सुरक्षेवर प्रश्न निर्माण होत आहे. दरम्यान, पोलिसांनी आरोपीवर किरकोळ कारवाईचे आदेश दिले आहेत. आरोपी शंकर धुमाळ यांच्याविरोधात मुंबई दारूबंदी अधिनियम 58 (1), भारतीय दंड संहिता कलम 352, 351 (2), (3)132,333 आणि पोलीस अधिनियम 9122 अंतर्गत कलम 3 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित प्रकरणात पोलीस पुढील तपास करत आहेत.