नांदेड हादरलं! अचानक पूर आला आणि माय-लेकीसह भाची वाहून गेली, दीड किलोमिटर दूर...

मुंबई तक

29 May 2025 (अपडेटेड: 29 May 2025, 09:21 AM)

अरुणा बलवंत शकरगे (वय 35), त्यांची मुलगी दुर्गा बलवंत शकरगे (वय 10) आणि भाची समीक्षा विजय शकरगे (वय 7) यांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला.

Mumbai Tak
Google CTA

बातम्या हायलाइट

point

नांदेडमध्ये धक्कादायक घटना!

point

माय-लेकीसह तिघीजणी बुडाल्या

point

धक्कादायक घटनेनं हादगाव तालुका हादरला

नांदेड: नांदेड जिल्ह्यातील हदगांव तालुक्यातील वरवट गावात मंगळवारी मूसळधार पावसामुळे एक हृदयद्रावक घटना घडली. शेतातून घरी परतत असताना अचानक नाल्यात आलेल्या पाण्याच्या प्रवाहात तिघे जण वाहून गेले. माय-लेक आणि भाची या पाण्यात वाहून गेली. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.

हे वाचलं का?

अरुणा बलवंत शकरगे (वय 35), त्यांची मुलगी दुर्गा बलवंत शकरगे (वय 10) आणि भाची समीक्षा विजय शकरगे (वय 7) यांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला. समीक्षा ही तिसरीच्या वर्गात शिकत होती. ती श्री गणेश महोत्सवाच्या तयारीसाठी आंगनवाडीत जात होती. ही घटना एवढ्या अचानक घडली की कुणालाही सावरण्याची संधी मिळाली नाही. तिघीही थेट वाहून गेल्या.

हे ही वाचा >> नवीन जीन्समुळे घेतला जीव, मोठ्या भावाने धाकट्या भावासोबत केलं असं काही...

घटनेची माहिती मिळताच हदगांवच्या तहसीलदार सुरेखा नांदे, पोलीस निरीक्षक उमाकांत पुणे आणि प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. ग्रामस्थ आणि प्रशासनाने मिळून शोधकार्य सुरू केलं आणि घटनास्थळापासून जवळपास अर्धा किलोमीटर अंतरावर तिघींचे मृतदेह आढळले.

आर्थिक मदतीचं आश्वासन

हे ही वाचा >>  कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची होणार विक्रमी नोंद! 'या' भागात असणार रेड अलर्ट

हदगांवचे शिवसेना आमदार बाबूराव कदम यांनी या घटनेबद्दल दुख: व्यक्त केलं. त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना याबाबत माहिती देऊन पीडित कुटुंबाला आर्थिक मदत मिळवून देण्याचं आश्वासन दिलं आहे. पावसाळा सुरू होताच झालेल्या या घटनेमुळे प्रशासनासमोरही मोठं आव्हान निर्माण झालं आहे. ही घटना केवळ दुखदच नाही, तर प्रशासनासाठीही एक इशारा आहे.