बॉयफ्रेंडसोबत बिर्याणी खाताना हाड घशात अडकलं, तडफडून तडफडून तरूणीने जीव...रिसॉर्टमध्ये काय घडलं?

तरूणीच्या घशात ते हाड बराच वेळ अडकून होतं. श्वास घेता येत नसल्यानं ती बेशुद्ध पडली. तिची अवस्था पाहून प्रियकर तिला ताबडतोब रुग्णालयात घेऊन गेला. पण...

Mumbai Tak

मुंबई तक

• 11:00 AM • 29 May 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

पालघरमध्ये 27 वर्षीय तरूणीचा मृत्यू

point

बॉयफ्रेंडसोबत रिसॉर्टवर असताना घडला प्रकार

point

तरूणीच्या मित्रावरच कुटुंबाचे गंभीर आरोप

Palghar News : पालघरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एक मुलगी तिच्या प्रियकरासह एका हॉटेलमध्ये जेवायला गेली होती. तिथं त्यांनी बिर्याणी ऑर्डर केली. बिर्याणी खाताना, चिकनच्या हाडाचा एक छोटा तुकडा मुलीच्या घशात अडकला. त्यामुळे तिला श्वास घेण्यास खूप त्रास होऊ लागला. तिचा प्रियकर तिला ताबडतोब रुग्णालयात घेऊन निघाला. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे पालघरमध्ये खळबळ उडाली आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा >> कोयत्याचे 17 वार, सूर्यकांतने तडफडत जीव सोडला, बाप-लेकानं कुणाचंच ऐकलं नाही, वाद नेमका काय?

पोलिसांनी सांगितलं की, 27 वर्षीय मुलगी आणि तिचा प्रियकर शहराबाहेर एका रिसॉर्टमध्ये गेले होते. ते जेवण्यासाठी तिथल्या रेस्टॉरंटमध्ये पोहोचले. त्यांनी चिकन बिर्याणी ऑर्डर केली. दोघेही खूप आनंदानं बिर्याणी खात होते. त्यानंतर अचानक मुलीच्या घशात एक हाड अडकलं. तिला खोकला येऊ लागला. तिच्या प्रियकरानं तिला पाणी दिलं पण त्याचा काही उपयोग झाला नाही. हाड अडकल्यामुळे तिला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला.

रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मृत्यू

तरूणीच्या घशात ते हाड बराच वेळ अडकून होतं. श्वास घेता येत नसल्यानं ती बेशुद्ध पडली. तिची अवस्था पाहून प्रियकर तिला ताबडतोब रुग्णालयात घेऊन गेला. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी तरूणीला मृत घोषित केलं. रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच तरूणीचा मृत्यू झालेला होता.

मुलीच्या कुटुंबाचे मुलावर आरोप

हे ही वाचा >> नांदेड हादरलं! अचानक पूर आला आणि माय-लेकीसह भाची वाहून गेली, दीड किलोमिटर दूर...

या घटनेची माहिती मिळताच पोलीस पालघर रुग्णालयात पोहोचले. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. पोलिसांनी मुलीचा मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवला आहे. तरूण मुलीच्या अशा अवेळी मृत्यूमुळे तिचं कुटुंब चांगलंच हादरलं आहे. त्यांनी मुलावरच आरोप केले आहेत. मुलीला फसवून तिला मारल्याचा आरोप केला आहे.

पोस्टमॉर्टेम रिपोर्टमधूनच सत्य कळणार...

या प्रकरणाची माहिती देताना पोलीस निरीक्षक विजया गोस्वामी म्हणाल्या, मृत मुलगी 27 वर्षांची होती. आता अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आम्ही पोस्टमॉर्टेम रिपोर्टची वाट पाहत आहोत. अहवाल आल्यानंतर मुलीचा मृत्यू हाडामुळे झाला की त्यामागे दुसरे काही कारण होते हे स्पष्ट होईल.

    follow whatsapp