Rule Change From 1st June : मे महिना संपणार आहे आणि दोन दिवसानंतर जून 2025 ची सुरुवात होणार आहे. प्रत्येक महिन्याप्रमाणे पुढच्या महिन्याची सुरुवातही अनेक मोठ्या बदलांपासून होणार आहे. याचा थेट परिणाम प्रत्येक घरच्या तिजोरीवर पडणार आहे. घरगुती वापरात असणारा एलपीजी सिलेंडरच्या किंमतीतही बदल होऊ शकतो. तर क्रेडिट कार्डसंबंधीत नियमही बदलणार आहेत. जाणून घेऊयात अशाच 5 मोठे बदल आणि त्याच्या परिणामाबाबत सविस्तर माहिती..
ADVERTISEMENT
पहिला बदल - LPG सिलेंडरचे भाव
प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला जनतेची नजर एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत होणाऱ्या बदलांवर असते. याआधी मे महिन्याच्या सुरुवातीलाच ऑईल मार्केटिंग कंपनीने 14 किलोग्रॅम घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत बदल केले होते. तर 19 किलोग्रॅमच्या कमर्शियल LPG सिलेंडरच्या किंमतीत 17 रुपये प्रति सिलेंडर इतकी कपात केली होती.
CNG-PNG आणि ATF मध्ये होणार बदल
ऑईल मार्केटिंग कंपन्या प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी सिलेंडरच्या किंमती सोबतच एअर टबाईन फ्यूलचे दर (ATF Price) मध्येही बदल करते. मे महिन्यात याच्या किंमतीत कपात करण्यात आली होती आणि जूनच्या सुरुवातीला यामध्ये बदल पाहायला मिळू शकतं. याशिवाय CNG-PNG च्या नवीन किंमतीही जारी केल्या जाऊ शकतात.
हे ही वाचा >> Vaishnavi Hagawane: हगवणेंकडून वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय... वडील कॅमेऱ्यासमोर ढसाढसा रडले
तिसरा बदल - क्रेडिट कार्ड संबंधीत नियम
जूनच्या सुरुवातीलाच क्रेडिट कार्डमध्ये बदल झाल्याचं यूजर्सला पाहायला मिळेल. जर तुम्ही कोटक महिंद्राचं क्रेडिट कार्ड वापरत असाल, तर 1 जूनला मोठा धक्का बसू शकतो. यामध्ये सर्वात मोठा बदल ऑटो डेबिट ट्रान्जॅक्शन संबंधीत आहे. या बँकेचे क्रेडिट कार्ड यूजरचं ऑटो डेबिट ट्रान्जॅक्शन फेल होत असेल, तर बँकेकडून 2 टक्के बाऊन्स चार्ज लागू केला जाऊ शकतो. म्हणजेच कमीत कमी 450 रुपये आणि जास्तीत जास्त 5000 रुपये लागू शकतो.
चौथा बदल - EPFO 3.0 ची नवी घोषणा
सरकार EPFO चं नवं व्हर्जन EPFO 3.0 जून महिन्याच्या पहिल्या तारखेला लॉन्च केला जाऊ शकतो. नुकतच केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत याचे फायदे आणि बदलांबाबत माहिती शेअर केली होती. ईपीएफओचं नवं व्हर्जन लॉन्च झाल्याने देशातील 9 कोटींहून अधिक सदस्यांना एटीएममधून पीएफचं पैसे काढण्याची सुविधा मिळू शकते.
हे ही वाचा >> महिलेनं मुलीला प्रियकराच्या रुममध्ये नेलं..नराधमाने गुंगीचं औषध देऊन बलात्कार केला! नंतर घडलं भयंकर...
पाचवा बदल - Aadhaar अपडेट मुदत संपली
जून महिन्यात होणारा पुढचा बदल आधार कार्ड संबंधीत आहे. हा बदल पहिल्या तारखेपासून नाही, तर 14 जूननंतर पाहायला मिळेल. UIDAI ने आधार यूजर्सला फ्री आधार कार्ड अपडेटची सुविधा दिली आहे आणि याची डेडलाईन 14 जून आहे. या तारखेपर्यंत आधार अपडेट नाही केला तर, या कामासाठी 50 रुपयांच शुल्क आकारलं जाईल.
ADVERTISEMENT
